शिवराज जी नारियलवाले जालना यांच्या बाबत मुख्यमंत्री,गृहमंत्री यांना तहसील परतुर च्या मार्फत भाजपा युवा मोर्चा परतूर च्या वतीने बबनराव लोणीकर साहेब व राहुल भैया लोणीकर यांच्या सुचणे वरून निवेदन देण्यात आले

परतूर (प्रतीनीधी)
पोलिसां कडून सूडबुद्धीने अमानुषपणे करण्यात आलेल्या लाठीचार्ज चा तीव्र शब्दांमध्ये भाजपा युवा मोर्चा परतुर च्या वतीने जाहीर निषेध करत,दोषी पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ  कारवाई करण्यात यावी,नसता युवा मोर्चा तीव्र आंदोलन करेल,आसा आशयाचे निवेदन परतूर येथे तहसीलदार रूपा चित्राक यांना देण्यात आले निवेदना पूढे सांगण्यात आले कि
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून आजपर्यंत महिला तरुण संत महंत यांच्यासह अनेकांना हा माणूस मारहाण झाल्याचं स्पष्ट झाला आहे हे सरकार महाराष्ट्राचा सरकार आहे की रजाकारी प्रवृत्तीच सरकार आहे हाच खरा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे या महाराष्ट्रात मागील दोन वर्षात पोलिसांना देखील मारहाण झाली परंतु त्यावेळी काही विशिष्ट लोकांचा समुदाय समोर होता म्हणून की काय पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नाही परंतु भाजपा युवा मोर्चा चा पदाधिकारी याने एखाद्या चुकीच्या बाबी विरोधात आवाज उठवला म्हणून पोलिसांनी भाजपा युवा मोर्चाचे जालना जिल्हा सरचिटणीस शिवराज पहिलवान नारियलवाले या युवकाला अमानुष मारहाण केली आहे या माणूस मारहाणीचा भाजपा युवा मोर्चा म्हणून आम्ही निषेध करतो आहोत. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महानिरीक्षक तसेच पोलीस अधीक्षक यांनी या युवकाला मारहाण करणाऱ्या सर्व पोलिसांना तात्काळ निलंबित करावे.
भाजपा युवा मोर्चाचे जालना जिल्हा सरचिटणीस शिवराज पैलवान नारियल वाले आपल्या बहिणीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले असता ना तेथे उपस्थित असणारे पोलीस दर्शन देवावाले या युवकाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे एकत्र आलेल्या नातेवाईक व गवळी समाजाच्या तरुणांना शिवीगाळ करत होते या अन्यायाला वाचा फोडावी या उद्देशाने नारियल वाले यांनी त्यांचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला त्याचा राग मनात धरून उपस्थित सर्व पोलिसांनी मिळून संबंधित युवकाला अमानुष मारहाण केली आहे या माणूस मारहाणीचा सर्व स्तरातून जाहीर निषेध होत आहे.
भाजपा युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी कोरोना काळात सर्वसामान्य लोकांना मदतीचा खूप मोठा ओघ सुरु ठेवला होता शिवराज नारियलवाले यांनी पुढाकार घेऊन १०० पेक्षा अधिक युवकांचे रक्तदान शिबिर आयोजित केले होते सामाजिक बांधिलकी जपणारे युवा मोर्चा पदाधिकारी हे कायम संयमी आणि समाजहिताची कामे हाती घेतात परंतु अशा युवकांच्या विरोधात अगदी क्षुल्लक कारणावरून एवढी अमानुष मारहाण होत असेल तर ही प्रशासनासाठी अत्यंत गंभीर बाब आहे या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांवर मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महानिरीक्षक, जालना पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ कार्यवाही न केल्यास भाजपा व युवा मोर्चा आक्रमक पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही असे झाल्यास त्यासाठी सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील.
यावेळी सोबत उपस्थित शत्रूघन कणसे  ता..अध्यक्ष युवा मोर्चा परतुर   नगरसेवक कृष्णाजी आरगडे, शहराध्यक्ष राजेंद्रजी मुंदडा सरपंच माऊली सोळंके सरपंच केशव ढवळे, शेख नदीम,विष्णू उगले, युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवाजी  भेंडाळकर, संतोष हिवाळे शुभम सोळंके,शुभम कठोरे शिवसंग्राम सचिन खरात रोहित मुंदडा, गणेश बोंनगे, राजेश बोंनगे नामदेव कोरडे आदी भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते 🙏🙏

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण