डॉक्टर्स डे निमित्त प्रा.सहदेव मोरे पाटील यांच्या वतीने मंठा येथे डॉक्टरांचा सत्कार


मंठा(प्रतिनिधी)

कोविड काळात आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा देणार्‍या डॉक्टरांचा डॉक्टर्स डे चे निमित्त साधून प्रा. सहदेव मोरे पाटील यांच्या वतीने पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.  प्रसंगी मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेश मोरे, शरद मोरे, भाजपा तालुका सरचिटणीस नारायण दवणे, श्याम टाके, चंद्रकांत बोराडे, विनायक चव्हाळ, नारायण राठोड, योगेश देशमुख, विशाल वायाळ यांची उपस्थिती होती. 

कोवीड काळात आपल्या जिवाची पर्वा न करता डॉक्टरांनी रुग्ण सेवा केली.  प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना बाधित रुग्णांची सेवा केली, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी अशी सुचना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांनी केली होती त्या सूचनेनुसार प्रा.सहदेव मोरे पाटील यांनी मंठा शहरातील डॉक्टरांना कृतज्ञतापर प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन आज डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा दिल्या. 
=============
आपण समाजाचे देणे लागतो या भूमिकेतून प्रत्येक जण काम करत असतो, समाजकारणात मी सुद्धा या समाजाचे देणे लागतो या भूमिकेमधूनच कोविड काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा देणार्‍या डॉक्टरांचा सन्मान करावा अशी मनोमन इच्छा होतीच त्यात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर साहेब व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांनी सूचना केली आणि आज आम्ही मंठा शहरातील सर्व हॉस्पिटल्समध्ये जाऊन रुग्ण सेवा देणाऱ्या डॉक्टरांना प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा छोटेखानी सत्कार करण्याचा प्रयत्न केला
*-प्रा सहदेव मोरे पाटील*
==============
कोविड काळात रुग्ण सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा यथोचित सन्मान आणि सत्कार केला जावा अशी सूचना केली होती प्रा.सहदेव मोरे पाटील यांनी ही सूचना प्रत्यक्षात अमलात आणली आणि आज रुग्णसेवा देणाऱ्या तमाम डॉक्टरांना डॉक्टर्स डे च्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या व कृतज्ञता व्यक्त केली माझ्याकडून सुद्धा सर्व आरोग्यकर्मी डॉक्टर्स बंधू-भगिनींना डॉक्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा...!
*-बबनराव लोणीकर*
माजी मंत्री तथा आमदार परतुर विधानसभा

Popular posts from this blog

हातडी शिवारात बिबट्याची भटकंती;शेतकर्‍यात भितीचे वातावरण,शोधमोहिम सुरू शेतकर्‍यांना काळजी घेण्याचे आवाहन

परतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि