निम्नदुधना'ची चौदा दारे उघडली ३०३२४ क्युसेक्सचा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग


परतूर (प्रतिनिधी)


 निम्न दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी दुपारपासून जोरदार झाली. धरण शंभर टक्के भरल्याने सोमवारी सायंकाळी साडे सहा ते मंगळवारी (२१ सप्टेंबर) पहाटे दीड वाजेपर्यंत बारा दरवाजे, तर सकाळी आठच्या सुमारास विसर्ग वाढविण्यात आला. एकूण चौदा दारे ०.६० मीटरने उघडून ३०३२४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू 
करण्यात आला आहे. 
यामुळे सेलू- देवगाव फाटा मार्गे औरंगाबाद, जिंतूर कडे जाणारी वाहतूक तसेच अतिवृष्टी व मोठ्या विसर्गाने पूरस्थिती निर्माण झाली आहे.मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत धरण परिसरात गेल्या २४ तासांत ४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ५४६४ क्युसेक्स दराने धरणात पाणी आले असून सकाळी साडे सहा वाजेपर्यंत १३.३६७ दशलक्ष घनमीटर पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.


धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. रात्री आठपासून दहा वाजेपर्यंत लाभक्षेत्रातही ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पहाटे चार वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. धरण शंभर टक्के भरल्याने द्वार क्रमांक एक ते सात व चौदा ते ०.६० मीटरने उघडण्यात आली आहेत.त्या द्वारे ३०३२४ क्युसेक्स ( प्रति सेकंद ८ लाख ५८ हजार ४३२ लिटर ) पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी जास्त करण्यात येईल. नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.अशी माहिती निम्न दुधना प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण