पुरस्कप्रश्नांच्या सोडवणुकी सोबतच शिक्षकांच्या चांगल्या कामाचे कौतुक गरजेचे ,परतूर येथील शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हाध्यक्ष डॉ. रविंद्र काकडे यांचे प्रतिपादन


परतूर : शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध प्रश्नांची, समस्यांची सोडवणूक जरूर व्हावी, या सोबत चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जावा. अधिक चांगले काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करता यावे यासाठी हा पुरस्कार असून खरे काम करणाऱ्या शिक्षकांचा हा प्रातिनिधिक स्वरूपातील सन्मान असल्याचे मत जिल्हाध्यक्ष डॉ. रविंद्र काकडे यांनी मत केले. आखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या परतूर शाखेच्या वतीने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात आयोजन शहरातील मराठा क्रांती भवन येथे रविवारी सकाळी ११ वाजता करण्यात आले होते, यावेळी अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमाला सुखदेव चव्हाण, बाल शिक्षण तज्ञ नूतन मघाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानदेव नवल, गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे, प्रा.पांडुरंग नवल, गटसमन्वयक कल्याण बागल, बाबासाहेब भापकर, विष्णू वाघमारे, अरुण भांडवलकर, कैलास उफाड, सुरेश तोटे, सोमनाथ उदेवाळ आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

      कोरोना काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्या बरोबर कुटुंबांचे आरोग्य संरक्षण असो इतर कुठलेही शासकीय काम, आमच्या शिक्षक बांधवानी काटेकोरपने पार पाडले. ही सर्व कामे करत असतांना, आपली शाळा आणि विद्यार्थी यांच्याशी असलेली नाळ शिक्षकांनी तुटू दिली नाही. शिक्षकांच्या या मेहनतीमुळेच जिल्हापरिषदेच्या शाळेतील मुले  विविध शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करू शकली आहेत. अशा सर्व शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचा कायम आमचा प्रयत्न असेल असे पुढे बोलतांना डॉ.काकडे म्हणाले.

     ग्रामीण भागातील वाडी-वस्त्यावर काम करणाऱ्या महिला शिक्षिका आणि त्यांचे प्रश्न यावर काम करून त्यांचे प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून सातत्याने सुरु असून यापुढे ही अविरतपणे सुरु राहील, असल्याचे मत नूतन मघाडे यांनी व्यक्त केले.

     गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे, प्रा.पांडुरंग नवल, विनायक भिसे, महादेव काळे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

       ग्रामीण भागातील वाढोणा येथील जिल्हा परिषदेच्या एकाच शाळेतील तीन विद्यार्थ्यांना नवोदयसाठी पात्र करण्यास परिश्रम घेणारे तसेच वृक्ष लागवडी साठी पुढाकार घेणारे प्राथमिक शिक्षक विनायक भिसे आणि धनराज मल्लाडे, विष्णू शिंदे यांना शिक्षक रत्न पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. याशिवाय अश्विनी मोरे, वर्षा इज्जपवार, स्वप्ना गोडबोले, स्मिता गायकवाड, रुपाली कुलकर्णी, महादेव काळे,संदीप वाकळे, उमाकांत ठाकरे, रंगनाथ लहाने, अन्सारी नेहाल अहमद गुलाम, लक्ष्मण विचारे, विजयकुमार बोरुळे, नागनाथ गंगुलवार,बाबासाहेब गायकवाड, मंताजी ढाकरे, शेख निहाल अहमद सुभान, शाम वराढ, संतोष मुपडे, उद्धव माहळकर, ओंकार इंगळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास उफाड यांनी तर आभार विष्णू वाघमारे यांनी मानले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्याससाठी तालुकाध्यक्ष बाबासाहेब भापकर, सुरेश तोटे, सोमनाथ उदेवाळ.राजेश लोखंडे, तुकाराम आकात, राहुल सरकटे, गौतम गणकवार, सोपान वडेकर, विनोद सातोनकर आदींनी परिश्रम घेतले.
फोटो-पुरस्कार स्वीकारताना शिक्षक महादेव काळे दिसत आहे

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार