जलयुक्त शिवारला राज्यसरकार क्लीनचिट म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारचं काम सर्वोत्तम यावर महा विकास आघाडीचे शिक्कामोर्तब- माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर,जलयुक्त शिवार वरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर चिखलफेक करणाऱ्यांना चपराक-लोणीकर

देगलूर(प्रतीनीधी)
तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे जलयुक्त शिवार सारखे महत्त्वाकांक्षी योजना पूर्णत्वास गेले असून शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण न करता देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठवले जाऊ शकते व त्याचा उपयोग शेतीसाठी खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो जलयुक्त शिवार योजनेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार न होता अत्यंत प्रामाणिकपणे केवळ शेतकऱ्यांसाठी काम करण्यात आले होते जलयुक्त शिवार योजनेला मिळालेला क्लीनचिट मुळे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या सरकारचं काम सर्वोत्तम होतं यावर विद्यमान महा विकास आघाडी सरकारने शिक्कामोर्तब केला आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवारला आज जलसंधारण विभागाकडून क्लीनचिट मिळालेली आहे. या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या योजनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत महा विकास आघाडी सरकारने आग्रह धरला होता त्या आग्रहाखातर जलयुक्त शिवार योजनेची तपासणी करण्यात आली या योजनेमुळे पाणी पातळी कमी झाली शेतकऱ्यांचं नुकसान झालं असा आरोप महा विकास आघाडी सरकारमधील मंत्री आमदार व नेत्यांनी केला होता आजतागायत या प्रोजेक्ट वरून वाटेल तशी चिखलफेक माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात आली होती त्या सगळ्यांना या अहवालामुळे चपराक बसली आहे असेही लोणीकर यावेळी म्हणाले

जलयुक्त शिवार योजनेमळे खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामाच्या पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली असून काम झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी नगदी पीक घेतलं व त्यांचं उत्पादनही वाढलं आहे, या अभियानाअंतर्गत साठवणूक झालेल्या पाण्याचा शेतकऱ्यांनी वापर केला. त्यामुळे कामाची गुणवत्ता राखली गेल्याचाही निष्कर्ष समोर आला आहे. जलयुक्त शिवार याचा आणखी एक फायदा असा की, या ठिकाणी भरपूर साठवण क्षमता निर्माण झाली, त्यामुळे अभियान राबवलेल्या गावांमध्ये पाऊस उशिरा पडला तरीही टँकर लावण्याची गरज भासली नाही म्हणून जलयुक्त शिवार योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची आणि अत्यंत महतपूर्ण होती परंतु दुर्दैवाने केवळ फडणवीस द्वेषाने पछाडलेल्या सरकारने ही अत्यंत उपयुक्त असणारी योजना बंद केली असेही लोणीकर म्हणाले

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जिओ टॅगिंगसह फोटो अपलोड केल्या मुळे कामाची गुणवत्ता राखली गेली व कामात पूर्ण पारदर्शकताही आली अनेक गावांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी साठवले गेले ज्या गावात मागील दहा ते पंधरा वर्षापासून टँकर लागत होते त्या गावात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली जमिनीतील पाणीपातळी वाढली परिणामी विहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले अनेक कोरडवाहू प्रकारच्या जमिनी हंगामी बागायती तर हंगामी स्वरूपाच्या जमिनी बागायती पिकांनी बहरून गेल्या परंतु स्थगिती सरकारने चांगले काय वाईट काय याचा विचार न करता केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून देवेंद्र फडणीस यांच्या कार्यकाळातील सर्व योजनांना बंद करण्याचं महापाप महा विकास आघाडी सरकारने केलं आहे असा आरोप माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी केला

क्लीनचिट देताना जलसंधारण खात्याने असा निष्कर्ष मांडला आहे की, जलयुक्त शिवार अभियानामुळे पीक पेरणी क्षेत्र व शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात अतिशय स्तुत्य अशी सुधारणा झाली आहे अर्थात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात जलसंधारण खात्याने केलेले काम सर्वोत्तम असून शेतकऱ्यांच्या हिताचा आहे हे पूर्णतः स्पष्ट झालं आहे केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील द्वेषापोटी महा विकास आघाडी सरकारमधील अनेकांनी विनाकारण चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला ते सर्व लोक जलसंधारण विभागाच्या अहवालाने तोंडावर आपटले आहे असा सणसणीत टोला देखील लोणीकर यांनी यावेळी लगावला

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार