ह भ प तुकाराम महाराज मुंढे शास्त्री यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली वाघाळा येथील अंखड हरीनाम सप्ताहची सांगता

तळणि(रवी पाटील) 
काकूलती येता हरी 
क्षणभरी निवडीता ॥१॥
तुमची मज लागली सवे 
ठायीचे नवे नव्हो गडी ॥ धृ ॥

या जगदगुरू तुकाराम महाराजाच्या काल्याच्या प्रकरणातील मांडणी करणाऱ्या अंभगावर सुंदर निरूपण केले भगवान पर त्माची उपासना करत असत असताना दोन प्रकार सागितले आहे एक परमात्मा सगून मानला आहे तर एक निर्गुन मानला आहे शास्त्र त्याला निर्गुन म्हणतय आणि संत त्याला संगून म्हणतात संत ज्ञानोबारायाना सुध्दा हा प्रश्न पडला होता तुज सगून म्हणू की निर्गुन रे पण संताच्या नंतर लक्षात आले सगून निर्गूनी गोविंदू रे ज्याला शास्र अव्यक्त म्हणतात त्यालाच संत व्यक्त म्हणतात व्यक्त आणि अव्यक्त तुचि एक निभ्रांत हे निळोबारायाचे प्रमाण सिद्ध आहे भक्ती साधना ही व्यक्त होणारी साधना साधना असावी योग साधना ही अव्यक्त साधनात होते तर भक्ती मार्गाने केलेली साधना ही व्यक्त साधनांना ने प्राप्त होईल संतांनी सागीतल्या प्रमाणे निर्गुण परमात्मा हा प्राप्तीचा विषय नसतो निर्गुण हा अनुभव याचा असतो आणि सगूण प्राप्त करून घ्यायचा असतो मनष्य जर निर्गुणाच्या अनूभुतीचा विचार करू लागला तर मनुष्य जीवनात साधना खडतर आहे *नाना साधनाच्या केल्या खटाटोप अस निळोबारायांनी सांगीतलेच आहे*

मनुष्याच्या आयुष्यातील सगून परमात्म प्राप्तीचा विषय आहे ठरवले लोक तुमच्या सोबत खायला प्यायला उठबस करातील सगून जर मनूष्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर श्रीकृष्णाने गीतेत सांगीतल्या प्रमाणे तुम्हाला जर मी हवा असेल तर तुम्हाला माझ्यासारखे व्हावे लागेल  तुम्ही ज्या भावनेने माझ्याकडे याल त्याच भावनेने मी तुमच्या कडे येईल तुमची भक्तीचा भाव ज्या प्रमाणे असेल जप तप कर्म असेल भले मग योग साधनेचा भाव असेल त्या प्रमाणे मी तुमच्या सोबत असेल

*भक्तीच्या सिद्धांतातील ज्ञानोबारांयाची ओवी सांगीतली की विषय संपला ज्ञानोबारांयांची ओवी म्हणजे खणखणीत वाजणारा शिक्का आहे अनेक संतांनी माऊलीचे अभंग ओव्या किर्तनातून समाजाला सांगीतल्या आहे*

देवाकडे आपण ज्या भावाने जातो त्याच भावाने तो आपल्याकडे येत असतो तो फक्त भक्ताचा भाव बघत असतो *भाव तैसा हरी एक* एकच हरी पण जसा ज्याचा भाव तसा त्याचा देव देव काही बाजारात मिळणारी वस्तू नाही त्यासाठी भक्तीचा सघर्ष उभा करावा लागतो कॄष्णाच्या संवगड्यावर जसी भक्ती विश्वास प्रेम होते ती भक्ती भंगवंताला प्रिय होती ना देव सवंगड्याशिवाय राहु शकत नव्हता ना संवगडी देवाशिवाय देवाला आपले करायचे असेल  त्यासाठी भक्तीचा आलेखाची उंची मोठी असावी लागते ज्यानी ज्यानी परमार्थाची पराकाष्ठा केली ते ते व्यवहारीक जीवनामध्ये शहाणे राहीले आहे देव जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्यासाठी वेड सुध्दा व्हाव लागेल जशा गोपीका देवासाठी वेड्या झाल्या होत्या त्या वेडेपनात प्रेम आपुलकी विश्वास स्नेह या गोष्टीचा सुंगध दरवळत असे देव आणि गोपीका संवगडी यांच नाते मैत्रीचे नात होते भक्ताना शहाणे म्हणावे की वेडे म्हणावे याच सुदंर वर्णन महाराजानी उपस्थीता समोर केले 

कृष्ण चरिञ हे त्यागाचे चरित्र आहे ज्यामधून अनेक पैलू आपल्याला दीसतील पांडवाच्या आयुष्यातील देवाचा सहभाग हा धर्माच्या बाजूच्या सहभाग होता तो खरा धर्म आपण जोपासला पाहीजे कृष्णाला जरी आपण आचरणात नाही आनू शकलो पण त्याच्यासाठी गोपीनी संवगडयानी केलेली भक्ती आपण नक्कीच आचरणात आणू शकतो ती भक्ती जर आपण स्वीकारली तर देव देश अनधर्माकडे बघण्याची   हिमत होणार नाही असे महाराजांनी शेवटी सांगीतले 

सात दीवस चालणाऱ्या या सप्ताहाची सांगते साठी पंचक्रोशातून अनेकांची उपस्थीती होती संत नेमिनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यानी सात दिवस सांथ संगत केली महाप्रसाद वाटप करून सप्ताहाची सांगता झाली

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती