कितीही अडचणी आल्यातर शेतकरी हितासाठी कारखाना सुरु होणे गरजेचे - फुलारी


जालना (प्रतीनीधी)सहकारी साखर कारखाना हा शेतकरी हितासाठी सुरु होणे गरजेचे असुन कोणत्याही उद्योगाची चाके फिरली म्हणजे परिसरातील शेतकर्‍यांची आर्थीक उन्नती, त्या भागाची प्रगती होत असते हे सर्वज्ञात आहे. जालना साखर कारखान्यावरुन सध्या भाजपा सेनेला अडचणीत आणन्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसुन येते. यात भाजपाचा थेट फायदा नसला तरी खा. रावसाहेब दानवे यांचे भविष्यातील प्रतिस्पर्धी संपवणे किंवा त्यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावुन विरोधक कमकुवत करणे हा हेतु आहे. अशातच माजी खा. किरीट सोमय्या यांची आणि माझी राज्यातील एका विद्यमान मंत्री आणि अधिकारी यांच्या विरोधातील तक्रारी संदर्भात चर्चा झाली, तसेच औरंगाबाद येथील एक तक्रारदार आणि सोमय्या यांची भेट देखील त्याच वेळी झाली तेव्हा त्यांच्या हातातील काहि दस्तवेज आपल्या हातात होते आणि हे छाचाचित्र व्हायरल झाले यातुनच रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या भागधारकांची त्यांच्या कोडावळ्यातील काहींनी गैरसमजुत करुन दिली. यात त्यांचा आपल्या कोंडावळ्यातील कोणावर किती विश्‍वास आहे हा त्यांचा प्रश्‍न असुन आम आदमी पार्टी जेव्हा एखादी तक्रार करते तेव्हा ती सर्वाना जाहिर करुन किंवा उघड पद्धतीने करते. वास्तवात रामनगर सहकारी साखर कारखाना विषयी आम आदमी पार्टीने विधानसभा निवडणुकित उमेदवारी अर्ज दाखल करत असतानाच तत्कालीन निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे आक्षेप नोंदवला होता हे त्या संचालकांना माहिती आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा हा विषय चघळण्याचे काम आम्ही करत नाही. तसेच या प्रकरणी जर ते संचालक निर्दोष असतील तर त्यांनी आपले कागदपत्रांच्या प्रती आमच्याकडे द्याव्यात त्यांत तथ्य असेल तर आपण किरीट सोमय्या यांच्या पर्यन्त किंवा इतर नेत्यांना हे समजावुन सांगु. यामागचा हेतु एवढाच आहे कि तो कारखाना सुरु व्हावा आणि शेतकरी, कामगार, त्यांचे पाल्य यांना आधार व्हावा.
कैलास फुलारी आम आदमी पार्टी जालना

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी