वीज आणि अन्य प्रश्नांवरून शेतकऱ्यांचा केला जाणारा छळ कदापि सहन करणार नाही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा राज्य सरकारला इशारा,केंधळी बरबडा येथील 33 केव्ही उपकेंद्राचे लोणीकर यांच्या हस्ते लोकार्पण,राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही - लोणीकर यांचा राज्य सरकारवर आरोप



तळणि(रवी पाटील)
महाराष्ट्रात सत्तेत असणारे महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नावर तिळमात्र देखील गंभीर नसून विविध माध्यमातून फक्त वसुली करण्याचे काम सरकार करत आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आश्वासन देणाऱ्या या सरकारने वीज आणि अन्य प्रश्नांवरून शेतकऱ्यांचा छळ करू नये शेतकऱ्यांचा केला जाणारा छळ आम्ही कदापि सहन करणार नाही असा स्पष्ट इशारा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्य सरकारला दिला आहे

केंधळी बरबडा येथे लोणीकर यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात (2 कोटी 50 लक्ष रुपये) मंजूर केलेल्या 33 केव्हीच्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते यावेळी मंचावर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे सभापती संदीप भैय्या गोरे अंकुशराव बोराडे बाबुरावजी शहाणे भाजपा मंठा तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ जि प सदस्य पंजाबराव बोराडे पंचायत समिती उपसभापती नागेशराव घारे जिल्हा परिषद सदस्य शिवदास हानवते नाथराव काकडे कैलास बोराडे विश्वनाथराव कवळे अंकुशराव कदम निवास देशमुख माऊली वायाळ मुस्तफा पठान सुभाषराव घारे प्रसादराव बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती

पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की वीज ही आता प्रत्येकाच्या आयुष्यातील जीवनावश्यक बाब बनली असून स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर देखील विजेचा प्रचंड तुटवडा मतदार संघाचा संपूर्ण जालना जिल्ह्यात होता तो तुटवडा भरून काढण्याचे काम मागील पंचवार्षिक मध्ये मंत्रिपदाच्या कार्यकाळात आपण केले असून स्वातंत्र्याच्या 70 वर्षात जिल्ह्यात 79 - 33 केव्ही होते आपण मात्र केवळ चार वर्षात 49 - 33 केव्ही संपूर्ण जिल्हाभरात मंजूर देखील केले आणि त्याचे लोकार्पण देखील करण्यात आले असेही लोणीकर यावेळी पुढे बोलताना म्हणाले

मागील पंचवार्षिक पूर्वी केवळ जिल्ह्याच्या ठिकाणी 220 केव्ही होते परंतु मागील पंचवार्षिक मध्ये आपण परतुर याठिकाणी 220 केव्ही ची उभारणी करून विजेचा प्रश्न काही प्रमाणात संपवण्याचा प्रयत्न केला नेर ता.जालना या ठिकाणी दखील 132 केव्ही मंजूर करण्यात आले होते त्याचबरोबर मतदारसंघाचं संपूर्ण जिल्ह्यात विजेचे जाळे विणण्यासाठी आपण प्रयत्नशील होतो आहोत आणि भविष्यात देखील प्रयत्नशील राहू अशी ग्वाही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी बोलताना दिली

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तत्कालीन अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार तसेच तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा करुन जिल्ह्यातील विजेचा अनुशेष भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न केले असून परतूर विधानसभा मतदार संघात 13 - 33 केव्ही मंजूर केले आहेत त्यापैकी 12 - 33 केव्ही चे लोकार्पण झाले असून वायाळ पांगरी तालुका मंठा येथील 33 केव्ही चे लोकार्पण येत्या महिन्याभरात आपण करणार आहोत त्यामुळे शेतकऱ्यांना लोडशेडिंग भविष्यात निर्माण होऊ नये यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण कायम सरकारला धारेवर जाणार असल्याचे लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले

शेतकऱ्यांकडून वीजबिल वसुली करण्यासाठी वीज वितरण पिक्चर कंपनी साठी काही नियमावली बनवण्यात आली आहे त्या नियमांच्या पलीकडे जाऊन कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडता येत नाही तसे झाल्यास संबंधितांच्या विरोधात पोलीस कारवाई होऊ शकते त्यामुळे वीज वितरण कंपनीने रजाकारी न करता सामंजस्याची भूमिका घेणे आवश्यक आहे वीज बिल भरणा करण्यासाठी जनजागृती करावी मेळावे घ्यावेत संबंधितांना समजावून सांगावे त्यानंतर त्यांना नोटीस देणे आणि त्यापलीकडे देखील वीज बिल भरणा होत नसेल तर मग वीज कनेक्शन बंद करण्याच्या कारवाईचा बडगा उगारला तर किमान आपण शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत असे तरी शेतकऱ्यांना वाटेल परंतु वीज वितरण कंपनी कोणतीही पूर्वसूचना न देता विजेचे कनेक्शन बंद करणार असेल तर ही रजाकारी कदापि सहन केली जाणार नाही असा इशारा देखील यावेळी लोणीकर यांनी दिला

केंधळी-बरबडा या 33 केव्हीच्या लोकार्पण प्रसंगी पुढील 20 वर्षात परिसरात विजेचा तुटवडा भासणार नाही अशा स्वरूपाची 5 एमव्ही क्षमता असणारे ट्रांसफार्मर बसविण्यात आले असून त्यामुळे केंधळी हातवन बरबडा देवठाणा आवलगाव मंगरूळ पिंपरखेडा लिंबोना मेसखेडा ठेंगे वडगाव या गावातील विजेचा प्रश्न पूर्णपणे निकाली निघणार असल्याचे देखील लोणीकर यावेळी म्हणाले केदार वाकडी या ठिकाणी नवीन 33 केव्ही बनवण्यात यावे यासाठी देखील शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे सरकार सत्तेत बसलेले असल्या कारणामुळे कदाचित त्याला विलंब होत असेल असा चिमटा देखील यावेळी लोणीकर यांनी विद्यमान महाविकास आघाडी सरकारला काढला

राज्य सरकारला शेतकऱ्यांचा तळतळाट लागेल - राहुल लोणीकर
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले प्रसंगी बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर साहेब यांच्या माध्यमातून मतदारसघाचा पूर्णपणे कायापालट झाला असून मटका वॉटर ग्रीड दिंडी मार्ग यासह दोनशे गावात करण्यात आलेले डांबरीकरणाचे रस्ते विविध योजना यासह मतदारसंघ समृद्ध बनवण्याचं काम लोणीकर साहेबांच्या माध्यमातून झाले असून दुर्दैवाने सत्ता हातून गेल्यामुळे मागील दोन वर्षापासून परिसराचा संपूर्ण विकास खुंटला आहे परंतु या सरकारला सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नावरून कसल्याही प्रकारचे देणेघेणे नाही त्यामुळे या सरकारला शेतकऱ्यांचा तळतळाट नक्की लागेल आणि यापुढे शेतकऱ्यांचे सरकार सत्तेत येईल त्यात बबनराव लोणीकर पुन्हा एकदा मंत्री होतील आणि आपणच पुन्हा या परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध राहू अशा शब्दात राहुल लोणीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

यावेळी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अविनाश राठोड भाजपा ओबीसी मोर्चा मंठा तालुकाध्यक्ष प्रसादराव गडदे राजेभाऊ खराबे गणेश चव्हाळ बाळासाहेब तौर सुभाष बागल श्रीराम राठोड द्वारकादास चींचाने किसनराव चव्हाळ श्रीरंग खरात राजू नरवडे पवन केंदळे सोपान वायाळ प्रभाकर चव्हाण राजेभाऊ निर्वळ श्याम ढवळे सुंदर खरात भरत चव्हाळ आनंद वैद्य भगवान लहाने प्रमोद बोराडे रमेश बागल प्रकाश नानवटे सोपानराव खरात आनंद जाधव दत्ता खराबे कैलास चव्हाण बाबाजी जाधव तानाजी शेंडगे जगनराव टकले बाळासाहेब हजारे प्रकाश हजारे गीताराम हजारे बापुराव हजारे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती