सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

जालना जितूर महामार्गावर गांज्याची तस्करी, मंठा पोलीसाची धडाकेबाज कारवाई दोन जण ताब्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालू

प्रतिनिधी : (रवि पाटील /सुभाष वायाळ) 
जालना जितूर महामार्गावरील कर्नावळ पाटीजवळ इंडियन हॉंटेल जवळ एक संशयीत ट्रक उभा असल्याची बातमी गुप्तहेराकडून मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना मिळाल्या नंतर लगेच सर्व पोलीस f कर्मचार्याना घेऊन  सदर घटनास्थळावर जाऊन ट्रक सदर्भात विचारणा करून तपासणी केली असता या ट्रक मध्ये ०३क्कीटल ७ किलो च्या वर गांजा सापडला त्याची किमंत १८ लाख ४३६८० रू असुन व गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक सुध्दा यावेळी जप्त करण्यात आला असून त्याची किमंत २० लाख रूपये आहे विशेष बाब म्हणजे गांजा तस्करीचा संशंय कोणाला येऊ नये म्हणून नर्सरीसाठीची विविध प्रकारची  आठशे रोपे ज्याची किमंत ०६ लाख रुपये असून एकूण ४४ लाख ४३६८० रुपयचा मुद्देमाल मंठा पोलीसांनी जप्त केला आहे ताब्यात घेतलेला ट्रक क्रंमाक एम एच २१ वि एच १७५८ असून या ट्रकवरील दोनही व्यक्ती भोकरदन येथील असुन गोविद हिरालाल चांदा वय वर्ष ४२ व बादल हिरालाल चांदा वय वर्ष ३५ यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे

या तस्करी मध्ये पांढऱ्या गोण्यामध्ये लपवलेला १४८ पूडया मधील गांजा पोलीसांनी हस्तगत केला 

सदरची गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख उपविभागीय अधिकारी राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून या कारवाईसाठी

पोलीस निरीक्षक श्री संजय देशमुख पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत सोबत पोलीस अंमलदार दीपक आडे संदीप सुभाष राठोड घोडके प्रशांत काळे सुनील इलग इतर पोलीस कर्मचार्यानी मेहनत घेतली असून या कारवाई मुळे मंठा पोलीसांचे कौतूक होत आहे

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत