लोकनीधीतुन शेतकरी चळवळ उभारण्याचं काम करणार- सिध्देश्वर काकडे



मंठा(सुभाष वायाळ)जालना जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी राजाला न्याय मिळावा आणि शेतकरी वर्गाला चांगले दिवस यावे या हेतुने शेतकरी क्रांती सेनाची स्थापना करण्यात आली असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी म्हटले आहे. मि चळवळीतील कार्यकर्ता आसुन माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब हा शेतकरी मायबाप जणतेसाठी समर्पीत केला आहे. आजच्या परिस्थितीमध्ये शेतकरी चळवळ टिकवणं खुप म्हत्वाचं आहे. कर्जबाजारी शेतकरी, शेती मालाला योग्य हमीभाव मिळवुन देण्यासाठी, कापुस,तुर, सोयाबीन,. ऊस व फळबाग लागवड करणार्यां शेतकरी हिताची हि चळवळ उभी करण्यात आली आसुन आपण या संघटनेच्या माध्यमातुन राज्यभर वेळ प्रसंगी आक्रमक आंदोलन पेटवणार आहे. शेतकरी हिताचा लढा आता आपण स्विकारला आहे. लोक निधी ऊभा करुन संघटनेची चळवळ कायम ठेवुन शेवटच्या घटका पर्यंत शेतकरी हिताची बाजु आपण मांडतच रहाणार आसल्याचे शेतकरी क्रांती सेनेचे, कापुस परीषद, शेतकरी परीषद, शेतकरी मार्गदर्शन शिबिर, विविध संघटनेचे धेय्य धोरणं आखण्यात आली आहे. शेतकरी वर्गाला आज कोणीच वाली नसुन सर्व नेते मंडळीं हे सत्तेच्या मागं धावत आहेत. खरोखर आज शेतकरी वर्गाला मोठ्या चळवळीची गरज आहे. मी शेतकरी क्रांती सेनेच्या माध्यमातुन प्रामाणिक प्रयत्न करत रहाणार आसल्याचे सिध्देश्वर काकडे यांनी म्हटले आहे. शेतकरी व जणतेकडुन माझ्या आंदोलनाच्या पध्दतीची दखल नक्की घेतली जाईल आसे काकडे यांनी म्हंटले आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती