कायद्यावर लाकूड तोड गिरण्यांची करवत.................


परतुर  (हमूमंत दवंडे) परतुर शहरातील आरा गिरण्याच्या तपासनित वन विभागाचा हलगर्जीपणा वाढताच अवैध लाकूड वाहतूक बोकाळली आहे. दररोज रात्री १० ते सकाळी ७ या कालावधीत ट्रक-ट्रॅक्टरद्वारे लाकडाची वाहतूक सुरू आहे. वृक्षतोड व लाकूड वाह तुकीचा परवाना नसतानाही गिरणीसमोर वाहनांच्या रांगा आहेत. फिरते पथक दिसून येत नाही.

 वन विभागाची कारवाई ढेपाळली आहे. महसूल व पोलिस प्रशासनानेही बघ्याची भूमिका घेतली आहे.

तालुक्यातीलअवैध वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वन विभागाने स्वतंत्रनियमावली तयार केली पाहिजे. या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असावी दरमहा प्रत्येक आरा गिरणीचे रजिस्टर तपासून वृक्षतोडीसाठी परवानगी असल्याची शहानिशा करणे अपेक्षित आहे. वृक्षतोड परवानगी ते वाहतूक परवानगीसाठी अधिकारी नियुक्त कोण आहेत  मात्र, प्रत्यक्षात दिसत नाहीत.
परतुर तालुक्यात अवैध वृक्षतोड वाढली आहे. दिवसा कारवाईची शक्यता असल्यामुळे लाकूड माफियांनी दररोज रात्री लाकडांची वाहतूक सुरू केली आहे. रात्री १० ते सकाळी सात या वेळेत शेकडो वाहनांद्वारे शहरात लाकूड आणले जाते. विशेषतः आष्टी रोड वाटू र सातोना,माव पाटोदा या भागातून मोठ्या प्रमाणात लाकूड वाहतूक आष्टी रोडवर बघायला मिळते
 रेल्वे स्टेशन रोड परतुर ,परतुर गाव परिसरातील गिरण्यात (सॉ मिल्स) सर्वाधिक वाहनांची ये-जा सुरू असते. ट्रॅक्टर किंवा ट्रकमध्ये ताडपत्रीखाली झाकून लाकूड आरा गिरणीत विक्रीसाठी आणतात. हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू असून वन अधिकाऱ्यांनी सर्रास डोळेझाक केली आहे. बाभूळ, निंब  बांबू या प्रजातीचे झाड तोडण्यासाठी परवानगीची गरज नाही. पण, आंबा, कडूनिंब, पिंपळ, साग, चंदन अशा महत्त्वाच्या झाडांसाठी परवानगी आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या मालकीचे बांधावरील झाड तोडण्यासाठी तहसीलदार किंवा समकक्ष महसूल अधिकारी परवानगी देतात. वनक्षेत्रातील झाड तोडण्यासाठी वन अधिकाऱ्यांची परवानगी गरजेची आहे. मात्र, नियमाचे सर्रास उल्लंघन करून वृक्षतोड जोरात सुरू आहे. वाहतुकीचा परवाना नसताना शेकडो वाहनातून लाकडांची वाहतूक होते. शहर परिसरातील नाक्यावर संबंधित वाहनांची तपासणी बंधनकारक आहे. पण, वन विभागाचे फिरते पथक क्वचितच वाहनांची तपासणी करताना दिसत नाही. वठलेले झाड तोडण्यास परवानगी आहे. सध्या ओले लाकूड मोठ्या प्रमाणात शहरात आले आहे. या माध्यमातून दररोज लाखो रूपयांची उलाढाल असली तरी शासकीय महसूल बुडत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
फिरते पथक गायब
अतिक्रमण आणि अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी वन विभागाचे स्वतंत्र फिरते पथक असावे. या पथकाची जबाबदारी वनपरिक्षेत्र अधिकारी 
यांच्याकडे असते.  योग्य कारवाई  वन विभागाने करावी. फिरत्या पथकाचे काम कागदावर उरले आहे.
  दाट झाडीच्या परिसरातून सागवान आणतात. हा प्रकार म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. आरा गिरणीत खरेदी केलेल्या लाकडाची नोंद असते. झाडाची जागा, झाडाची प्रजात, शासकीय अधिकाऱ्याची परवानगी, वाहतूक परवाना यांची नोंद करणे बंधनकारक आहे. वन अधिकारी नोंद तपासत नसल्यामुळे गिरण्यात नोंद नसते. त्यामुळे लाकडू कुठून आणले याचा उलगडा होत नाही.
, विविध भागातून लाकडे भरूनआलेल्या वाहनांची नाक्यावर तपासणी होणे गरचे आहे .
पण या कडे वनविभागाने कानाडोळा केलेला दिसतो. लाकडांचनी भरून वाहने रोडवर आपणाला दिसतात. यावर प्रत्येक्ष  वन विभाग  अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.


 पण, रात्री अवैध वाहतूक होते. ती रोखण्याची जबाबदारी महसूल, पोलिस आणि वन विभागाची आहे. फळझाडांसह १३ प्रजातींची झाडे असल्यास वन विभाग कारवाई करतो. कडूलिंब व इतर लाकूड असल्यास महसूल प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित आहे.

‘लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याचे अनेकदा दिसते. मात्र, लाकूड माफियांना याबाबत जाब विचारणे जोखमीचे ठरते. वन विभागाने कडक कारवाई केल्यास वृक्षतोडीला आळा बसेल. परवानगी मिळवून क्वचितच वृक्षतोड होत असावी. या प्रकाराला आळा घालण्यासाठी वनविभागाने प्रयत्न केले पाहिजेत.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार