बदनापूर नगर पंचायत निवडणूकवॉर्ड क्रमांक १२ मध्ये भाजप आणि आघाडीत मारामारी!,इतर ठिकाणी शांततेत मतदान, ७७ टक्के मतदानबदनापूर(समाधान खरात)  नगर पंचायत निवडणूक च्या मतदानाची रणधुमाडी आटोक्यात आली असून आज बदनापूर शहरातील १२ वॉर्डात ७७ टक्के मतदान झाले आहे या मतदानाच्या  पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त केला होता शहरात पोलिसांनी पोलीस निरीक्षक शिवाजी बंडेवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक केंद्रात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तरीही वॉर्ड क्रमांक १२ च्या मोसंबी संशोधन केंद्र येथे मतदाना दरम्यान महाआघाडी आणि भाजपा च्या कार्यकर्त्यांत बोगस मतदानावरून तुंबळ हाणामारी झाली  यात भाजप चे कार्यकर्ते बोगस मतदान करत असल्याचे महाआघाडीच्या कार्यकर्त्यांना निदर्शनास आले असता ते एकमेकांत भिडले
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला
बाकी इतर मतदान केंद्रावर शांततेने मतदान झाले
शहरातील संपूर्ण १७ वॉर्ड साठी मतदान होणार होते परंतु मा कोर्टाच्या आदेशाने ओबीसी ठिकाणी मतदान स्थगित केले होते त्यामुळे १३ वॉर्डात मतदान होणार असल्याने वॉर्ड क्रमांक ८ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या एक उमेदवार  बिनविरोध निवडुन आल्याने बाकी १२ वॉर्डात ७७ टक्के मतदान झाले
संपूर्ण  मतदान केंद्रात अतिरिक्त पोलीस मागवून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता
 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून येत्या १९ जानेवारी ला संपूर्ण १६ वॉर्ड ची मतगणना होणार आहे
कोण कोणत्या वॉर्डातून निवडून येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे ठिकठिकाणी दोन तीन जण निवडणूक विषयी चर्चा करतांना दिसत आहे शेवटी आता मतदारांनी आपले हक्क बजावून मतदान यंत्रात सीलबंद केले आहे

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण