परतूर थर्टी फस्ट' चौकाचौकांत पोलिसांचा फाैजफाटा; धांगडधिंगा करणाऱ्यांवर फिरत्या पथकांचा वॉच


परतूर (हनुमंत दवंडे) नववर्ष स्वागतासाठी शहरवासीयांकडून जल्लोष केला असून काही जण मद्यपान करून धांगडधिंगा करत वाहने फिरवतात.
        परतूर शहरात 'थर्टी फस्ट' चौकाचौकांत पोलिसांचा फाैजफाटा; धांगडधिंगा करणाऱ्यांवर फिरत्या पथकांचा ‘वाॅच’
नववर्ष स्वागतासाठी शहरवासीयांकडून जल्लोष केला जातो. यात काही जण मद्यपान करून धांगडधिंगा करत वाहने फिरवतात. हे प्रकार रोखण्यासाठी परतूर पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरातील मुख्य चौक तसेच अंतर्गत भागात पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी शुक्रवारी (दि. ३१) दुपारी चार ते रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तसेच फिरत्या पथकांचा ‘वाॅच’ राहणार आहे.  
कोरोना तसेच ओमायक्राॅनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे. सरत्या वर्षाला निरोप देतानाच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरवासीयांकडून मोठा जल्लोष केला जातो. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मद्यपान करून वाहने दामटण्याचे प्रकार हाेतात. त्यासाठी शहरात ठिकिठिकाणी बॅरिकेड्स लावून नाकाबंदी करण्यात येणार आहे. संशयित वाहन व चालकांची तपासणी करण्यात येणार आहे.  .

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान