संपत टकले यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील ७० रुग्णांच्या नेत्र शस्त्रक्रिया साठी प्रयन्त

परतूर(प्रतीनीधी)ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांच्या डोळ्यांच्या विविध आजारावरून होणारी फरफट,स्थानिक स्तरावर सुविधा उपलब्ध नसल्याने मोठ्या शहरात  उपचार करवून घेतांना सहन करावा लागणारा आर्थिक भार आदी कारणांमुळे ग्रामीण भागातील लोक डोळ्यांच्या आजाराकडे दुर्लक्ष करतात. डोळ्यांच्या आजाराकडे झालेल्या दुर्लक्षामुळे अनेकांना अकाली अंधत्वाच्या सामना करावा लागतो. ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संपत टकले यांनी पुढाकार घेत श्रीष्टी सर्कल मधील ७० रुग्णांच्या नेत्र शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प केला आहे. बुधवारी सकाळी यातील ३० रुग्णांची पहिली फेरी शस्त्रक्रियेसाठी जालना येथे पाठविण्यात आली. यावेळी सेवा निवृत्त मंडळ अधिकारी भानुदासराव टकले यांच्या हस्ते रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी नेत्रतज्ञ डॉ. शिवाजी पोकळे, मावचे सरपंच अरविंद सवने, मदन बोराडे, परमेश्वर सवने, नामदेव सवने, रणजित सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. स्थानिक परिसरातील शेतकरी, शेतमजूरांच्या विविध प्रश्नांवर आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत.आगामी काळात देखील अनेक सामाजिक उवक्रम राबविण्याचा आपला मानस असल्याचे मत यावेळी संपत टकले यांनी व्यक्त केले.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण