देवगिरी पतसंस्थेच्या बचतगट प्रतिनिधीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी,मंठाप ोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..._


  

मंठा(सुभाष वायाळ)दि.21 देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा मंठा यांच्या वतीने मंठा तालुक्यात महिला बचत गट लोन देण्याचे काम चालू आहे, तालुक्यातील प्रत्येक गावात लोन वाटप आणि मार्गदर्शन करण्याचे काम जोमाने सुरू आहे. असेच दिनांक 20 डिसेंबर रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास देवगिरी पतसंस्थेचे बचत गट प्रतिनिधी विकास दराडे हे कर्नावळ ता. मंठा येथे महिला बचत गटाला मार्गदर्शन करण्यासाठी गेले असता. प्रयागबाई भोपा चव्हाण यांच्या घरा पुढे ते मार्गदर्शन करीत असताना कर्नावळ येथे रहिवासी आकाश चव्हाण ही व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन म्हणाली की, आपण चुकीचे मार्गदर्शन करत आहात म्हणून वाद करून शिवीगाळ करून बचत गट प्रतिनिधी विकास भगवानराव दराडे यांच्या डोळ्याखाली वार केला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून आकाश चव्हाण या इसमा विरुद्ध देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा मंठा व बचत गट प्रतिनिधी विकास भगवानराव दराडे यांनी मंठा पोलीस ठाणे येथे जाऊन भारतीय दंड संहिता १८६०कलम ३२३,५०४,५०६ दाखल करून आकाश चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे . तरी आरोपीला लवकरात लवकर अटक करून योग्य ती कारवाई करावी व बँकेचा कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी देवगिरी पतसंस्था मंठा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण