जिल्हा परिषद शाळेतील मुले पी.एच.डी.धारक शिक्षकाच्या हाताखालील गिरवताहेत अ,ब,क,ड.. मंठा (सुभाष वायाळ) महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.पूर्वीच्या काळी महाराष्ट्रात गुरुकुल शिक्षणपद्धत अस्तित्वात होती.पुढे काळाच्या ओघात शिक्षण पद्धतीमध्ये बदल होत गेले. त्यामध्ये शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा सुरू झाल्या कालांतराने लोक खाजगी शाळा व शासकीय शाळांमध्ये तुलना करू लागले. एक अलिखितनियम असा नियम रूढ झाला की, श्रीमंताची मुले खाजगी शाळेमध्ये व गरिबांची मुले शासकीय म्हणजेच जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, वस्तीशाळा अशा शाळेमध्ये त्यामध्ये खाजगी शाळा म्हणजे सुसज्ज इमारत, श्रीमंतांची मुले, सर्व भौतिक सुविधायुक्त, विद्यार्थी व शिक्षक मध्ये नीटनेटकेपणा, स्कूल बस, किंवा ने आण करण्यासाठी  विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या चारचाकी गाड्या, अभ्यासासाठी टॅब,लॅपटॉप, डिजिटल टीचिंग बोर्ड, अशा असंख्य गोष्टी खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये सहज उपलब्ध होतात,सहाजिकच या सर्व गोष्टींमुळे लोकांचा लोंढा हा या शाळेकडे वळाला.  परंतु याच्या उलट जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, वस्तीशाळा वार्ड वार्ड मध्ये व गावागावांमध्ये असणारे गलिच्छ राजकारण व्यवस्थापनाच्या नावाखाली शाळेमध्ये सर्रास केले जाते. तसेच भौतिक सुविधेचा अभाव, विजेचा प्रश्न, मोडकळीस आलेल्या इमारती, काही ठिकाणी पालकांचा अडाणीपणा, शिक्षकांना शाळा व्यतिरिक्त कामे, शिक्षकांची कमतरता, या अशा असंख्य अडचणींवर मात करून शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च मानली जाणारी पदवी म्हणजेच डॉक्टरेट व तीही जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकांनी मिळवणे म्हणजेच विदेशातील शिक्षण पद्धतीलाही लाजवेल अशी कामगिरी करणारे शिक्षक ही जिल्हा परिषद शाळेमध्ये असतात हे दाखवून देणारे असे  अवलिया शिक्षक मंठा तालुक्यामध्ये आहेत आणि त्यांचे नाव आहे. डॉ. गोपाल विठोबा तुपकर त्यांचे शिक्षण एम.ए.इतिहास, मराठी, राज्यशास्त्र, डी.एड.,बी.एड. एक संवेदनशील लेखक,कवी, तसेच सामाजिक कार्याची आवड असणारे समाज सेवक त्यांचे आतापर्यंत तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यामध्ये 1) अंतरीचे शब्दफुले,2) रंग भावनाचे तसेच अनेक वृत्तपत्रांमध्ये सुद्धा लेख प्रकाशित झालेले आहे. असे हे सर्व गुण संपन्न असणारे शिक्षक मंठा तालुक्या पासून 12 किलोमीटर असणाऱ्या माळतोंडी या गावाला लाभलेली आहेत. जिल्हा परिषद च्या शाळेमध्ये असणाऱ्या असंख्य अडचणीवर मात करून उच्चशिक्षित असूनही कुठल्याही प्रकारचा मीपणा न ठेवता विद्यार्थीप्रिय असलेले शिक्षक जिल्हा परिषद सारख्या शाळेला मिळणे म्हणजे भाग्यच समजावे लागेल. विद्यार्थ्यांमध्ये एकरूप होऊन त्यांना बाराखडी,उजळणी,इंग्रजी,मराठी कविता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शिकवतात. व त्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक, गुणवत्ता  विकास हे एकच ध्येय समोर ठेवून या शिक्षकाचे काम अविरतपणे चालू आहे. त्यांच्या या कार्याची दखल राज्य शासनाने घ्यावी. अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.त्यांच्या या कार्याला शुभेच्छा !

शब्दांकन- प्रा.सतीश वैद्य

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण