श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर ( प्रथम) राज्याभिषेक दिन सोहळ्यास मोठ्या संख्येने सहभागी व्हा...


परतूर प्रतिनिधी/दवंडे हनुमंत
आपला स्वाभिमान चला करू या महाराजांचा सन्मान इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे चक्रवती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा दिनांक 6 जानेवारी रोजी वाफगाव किल्ल्यावर मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.पुणे जिल्ह्यातील वाफगाव येथे 9:30 वाजता विविध कार्यक्रमाने सुरुवात होणार आहे होळकर घराण्यातील व समस्त भारत वासियांच्या  उपस्थितीत गाव दर्शन ,गड पूजन , ध्वजपूजन, ध्वजारोहण  ,राज्याभिषेक तळी भंडार ,व महाराजांना अभिवादन असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.अखंड भारत आणि Nation first, चा नारा देणारे देशाच्या इतिहासात इंग्रजांविरुद्ध सलग 18 लढाया अजिंक्य असणारे इंग्रजांना देशातून परतवून लावण्यासाठी देशातील सरदार- वतनदार -राजे यांना आपल्यातील वाद थांबवून इंग्रजांविरुद्ध एक  होण्यासाठी प्रयत्न करणारे देशासाठी आणि देशाच्या अखंडतेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी आजीवन लढणारे आद्यस्वातंत्र्य योद्धे राजराजेश्वर श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा हा दिवस सर्व भारतीयांसाठी प्रेरणा दिवस आहे. तरी सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान शिवाजी भालेकर (धनगर समाज उन्नती मंडळ जिल्हा अध्यक्ष तथा राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष) बाबु गोसावी वंचित बहुजन आघाडी ता. अध्यक्ष परतुर, हनुमंत दवंडे धनगर समाज उन्नती मंडळ ता.परतूर तथा मौर्य क्रांती संघ तालुकाध्यक्ष परतूर) नामदेवराव गोरे रासपा परतुर, भगवान पाटोळे,प्रकाश दिवटे, संपत बानगावडे ,योगेश गायकवाड ,कृष्णा गायकवाड, योगेश भले ,नंदकुमार गांजे धनगर समाज उन्नती मंडळ परतुर,  डिगंबर भले ,रामेश्वर भले, माऊली सागुते ,  विलास रोकडे, विष्णू गुंजाळ , सोमेश्वर गायकवाड, सोपान गोरे, दादाराव बकाल, रामेश्वर दुगाने, असे आवाहन यांनीकेले आहे.

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान