पत्रकार राहुल मुजमुले यांना उत्कृष्ट युवा पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार.....


परतूर –(हनूमंत दंवडे)
परतूर येथील पत्रकार राहुल शामराव मूजमुले  यांना मराठी पत्रकार संघाच्या वतीने  उत्कृष्ट युवा पत्रकार पुरस्कार मिळाला परतूर येथे आयोजित दर्पण दिननिमित्त कार्यक्रमात   मराठी पत्रकार संघ  परतूर पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

              परतूर तालुक्यात राहुल मुजमुले यांनी २०१६ पासून पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात करून गेल्या पाच वर्षापासून पत्रकारिता पदवी घेऊन जनसामान्य माणसाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपल्या पत्रकरीतेतून प्रश्नांना निर्भीड वाचा फोडत सातत्याने न्याय देण्याची भूमिका बजावत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आपले योगदान देत असल्याने पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी आपला ठसा निर्माण केला आहे. याची दखल घेऊन त्यांना मराठी पत्रकार संघ परतूर शाखेच्या  वतीने श्री.मूजमुले उत्कृष्ट युवा पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
                          या निवडीबद्दल  पत्रकार संघटना, पोलिस, राजकीय, सामाजिक संघटना कडून सत्कार करण्यात आला आहे.
दरम्यान,दर्पण दीना निमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री.मुजमुले याना पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी. आ.बबनराव लोणीकर, मा.आ.सुरेशकुमार जेथलिया,मुख्याधकारी सुधीर गवळी,सभापती कपिल आकात,प्रभारी अध्यक्ष सादेक खतीब,मा.न.अध्यक्ष विनायकराव काळे,विजयनाना राखे,मोहन अग्रवाल,सुधाकर बापू सातोनकर,शत्रूघ्न कणसे, संतोष चव्हाण,मधुकर झरेकर,पत्रकार संघाचे अध्यक्ष शामसूंदर चितोडा, सचिव सुरेश कवडे,योगेश बरीदे, कैलाश सोंळके,रशिद बागवान,सय्यद वाजेद,संजय देशमाने,शेख अथर,कैलास चव्हाण,मुमताज अंसारी,शेख तारेक, इम्रान कुरेशि,सय्यद जूनेद,एकनाथ राऊत,आदींनी अभिनंदन केले.
..................
फोटोओळी-- परतूर तालूका युवा पत्रकार पुरस्कार राहुल मुजमुले याना मिळाला यावेळी त्याचा सत्कार करतांना आ.बबनराव लोणीकर, मा.आ.सुरेशकुमार जेथलिया,मुख्यअधिकारी सुधीर गवळी,मोहन अग्रवाल,सुधाकर सातोनकर,सादेक खतीब,सिदार्थ बंड,योगेश बरीदे,मुन्ना चितोडा आदी दिसत आहे.

पूर्ण...

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान