तळणि येथे मरावीकंपनी च्या वतीने हर घर दस्तक योजने अत्तर्गत विज बील भरण्याचे व्यवस्था

तळणी (रवी पाटील)महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी च्या वतीने हर घर दस्तक योजने अत्तर्गत विज वितरणच्या ग्राहंकांना विज बिल भरण्याची व्यवस्था या योजनेद्वारे महावीतरणकडून ग्राहकांच्या घरीच होणार असल्याने या योजनेमुळे विज वितरणच्या ग्राहकांमध्ये नियमित बिल भरण्याची सवय लागून वसुलीच्या प्रमाणात वाढ होऊन ग्राहंकाचा सुध्दा वेळ व विज बीला साठी भरण्यासाठी इतर सेवा केद्रावर लागणारा अतिरीक्त पैसा सुध्दा यामुळे वाचणार आहे या योजने मुळे महावीतरणचे कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन विज बिलाचा भरणा केल्यावर जाग्यावरच पावती पाँश मशिनद्वारे ग्राहकांना मिळणार आहे 

तळणी गावचा विचार करता बिल भरण्यासाठी ग्रांहकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असे या पाँश मशिनद्वारे ग्राहंकाकडे विज बिल नसले तरी त्या ग्राहकांकडील बिलाची रक्कम किती आहे हे कळनार आहे ग्राहकाने ग्राहक नबंर सागीतल्यानंतर त्याची पूर्ण बिलाच्या रकमेची  माहीती कळनार आहे तळणी येथे एकुण ७३० आधिकृत ग्राहक असुन जवळपास चार लाख रूपयाच्या आसपास ची महिन्याची वसुली तळणी गावातून महावीतरण ला जाते मोठा व्यापारी वर्ग असून स्थानिक लाईनमन वसुलीच्या निमित्याने प्रत्येक ग्राहकांच्या घरी जाणार असल्याने त्या ग्राहंकांची अडचण सुद्धा या निमित्याने महावीतरणच्या कर्मचार्याला समजणार आहे ग्रामीण भागात या योजनेमुळे ग्रांहकाना सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न महावीतरणचा दीसतो आहे तळणी येथे ऐबी केबल टाकल्यापासुन विज वितरणच्या विज पूरवठ्यात नियमितता आली असुन लाईनमन व महावीतऱण इतर कर्मचारी या साठी प्रयत्न करतानाचे चिञ तळणी येथे दीसत आहे 


हर घर दस्तक योजना  मोबाईल कनेक्ट बुल्टूथ  प्रिंटर च्या सह्याने विज ग्राहकांना लाईट बिलाची पावती जागेवर देणे अगदी सोपे झाले  विज बिल् वसुली अधीकच वेग येणार असुन ग्रांहक व महावीतरण याचा थेट सवांद व अडचणी सुध्दा लक्षात या योजने द्वारे येणार
  एस एन पौळ यानी सागीतले

महावीतरणच्या या योजने मुळे व्यावसाईकाना सोईचे होणार आहे बिल भरण्यासाठीचा लागणारा वेळ शिलक पैसे देण्याची गरज लागणार नाही यामुळे विज बिल भरण्याची नियमीतता सुध्दा ग्राहंकामध्ये होईल अशी प्रतिक्रीया       पीठ गिरणी मालक अनिल तौर यानी दीली

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार