तुकोबारांयानी कधीच काही देवाकडे काही मागीतले नाही हीच वृत्ती मनुष्याची असली पाहीजे -ह. भ.प. तुकाराम महाराज मुंढे

तळणी (रवी पाटील ) मनुष्याच्या आयुष्यात कितीही मोठा सघर्ष करण्याची वेळ आली तरी किचतही न डगमगता त्या संकंटाला सामोरे जाण्याची वृती मनुष्यात असली पाहीजे पांडूरंगावरची  नितांत असलेला भक्ती भावच त्याच्चा ईच्छा आकांशा पूर्ण करणारा असला तरी तुकोबारांयानी कधीच काही देवाकडे काही मागीतले नाही हीच वृत्ती मनुष्याची असली पाहीजे देवाकडे जाताना आपण काही मागायचे नसते आपल्या कर्मानुसार सर्व गोष्टीची उपलब्धतता होत असते त्या साठी मनुष्याने सांसांरीक आयुष्य जगत असताना समाधानी असले पाहीजे असे उदगार ह भ प तुकाराम महाराज मुंढे यानी व्यक्त केले तळणी येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्य चालू असलेल्या श्री संत तुकोंबारायांचे चरित्राचे कथन करत असुन सहाव्या दिवशी पंचक्रोशीतील अनेक जणांनी या चरित्राचा आस्वाद घेतला  

प्रत्येक संकटाला सामोरे जाऊन स्वःतचे अस्तीत्व निर्माण करणारे जगदगुरू तुकोबाराय आपल्यासाठी पाचवा वेद म्हणून गाथा निर्माण केला तो गाथा आपल्यासाठी आदर्श आहे तो गाथा माथ्यात घेऊन आपले सांसारीक आयुष्य जगणे सध्याच्या युगात गरजेचे आहे तरच आपल्या पीढीसाठी आपण काहीतरी आदर्श समोर ठेवू शकूत संत तुकाराम यांचे आदर्श संत ज्ञानेश्वर संत नामदेवराय  व अन्य संत मडळीचां आदर्श त्याच्या पूढे होता त्यानी दाखवलेल्या मार्गावर च आपण सध्या मार्गक्रमण करणे गरजेचे आहे वडीलोपार्जीत सावकरीला स्पर्श न करता त्याचा कधीच स्वीकार केला नाही त्या धनाची त्या श्रीमंतीची अपेक्षा तुकोबारांयानी कधी केला तुकोबारायांनी अभंग लिहीण्यासाठी संसार जाळला परतू आता संसार चालवण्यासाठी अंभग विकावे लागते ही शोकांतीका 

तुकोबारायांच्या आयुष्यात त्यांच्या धर्मपत्नीला सुध्दा मोठे स्थान आहे ज्या तुकोबारायांनी पाडुंरग परत्माची भक्तीभावाने श्रध्देने भक्ती केली त्या तुकोबांरायांची भेट सुध्दा देवाने सहज भेट  घेतली नाही पंरतू जीजाबाईच्या पायातील मोडलेला काटा काढण्यासाठी देव जीजाबाईना सहज भेटला देव जर जीजाबाईच्या पायाला स्पर्श करू शकतो म्हटल्यांवर त्या मातृ शक्तीचा किती मोठो असू शकतो यांचा विचार आपण करणे गरजेचे आहे तुकोबारायांना जेवण दील्याशिवाय जीजाबाई कधीच जेवल्या नाही त्या ऊलट आजची परिस्थीती खूप वेगळी  आहे माता भगिनी संसारीक जीवनामध्ये जीजाबाईचा आदर्श घेतला पाहीजे तसाच आदर्श वन्य पक्ष्याकडून घेतला पाहीजे त्याना पोटाला लागेल तितकेच ते जमा करतात पंरतू मनुष्याला सांसारीक  जीवनात लागलेली हाव भक्ती मार्गातील सर्वात मोठा अडसर आहे मनुष्याने संसारीक गरजेपूर त्या गोष्टीचा विचार केला पाहीजे ,

प्रत्येक मनुष्याच्या जीवनात सकटे येत असतात आणि ते निवारतात देखील त्यासाठी संयंम ठेवणे गरजेचे आहे ज्या प्रभू रामचंद्राना सकाळी राज्याभीषेक होणार होता त्या राज्याला वनवासात जावे लागले वयाच्या सतराव्या वर्षी बारा वाडयाची महाजन की घेऊन मिरवणारे तुकोबाराय जरीचा पटका घालून घोडयावर फेरफटका मारणारे तुकोबारायांना वयाच्या एकवीसव्या वर्षी राहायला घर राहीले नाही प्रंपचांचे झटके अयोध्येच्या रामाला देहुच्चा संत तुकोबारायांना चुकले नाही तर येथे तुमची आमची काय बिशाद आहे प्रांपचीक अडचणीतून त्यावर मात करून मनुष्याने मार्गक्रमण केले पाहीजे उध्दवस्त झालेला माणुस एक तर संत होईल नाही तर आत्महत्या करेल आणी संत ही झाला नाही आणी आत्महत्या ही नाही केली तर तो एक नंबरचा दांभीक झाल्याशिवाय राहणार नाही तुकोबारायांच्या उदार वृती मुळे स्वःतचे सर्व व्यवहारीक आयुष्य लोकाच्या सांसारीक आयुष्यासाठी दान दीले व स्वःतच्या संसारीक आयुष्य हे भगवतांच्या स्वाधीन दिले द्रढ भक्ती भाव व साधनेने देवाला आपलेस करणारे तुकोबाराय खऱ्या अर्थाने श्रीमंत होते ती श्रीमती आपल्याला ससारीक आयुष्यात स्वीकारायची असेल तर तुम्ही आम्ही तुकोबारायाच्या भक्ती  मार्ग निवडा देव तुम्हाला नक्कीच आपलेसे केल्याशिवाय राहनार नाही 

यावेळी महाराजांनी शेतकरी आत्महत्यावर सरकारच्या धोरणावर सुध्दा टीका केली निसर्गाच्या लहरी पणाचा फटका हा शेतकर्याच्या बसत असुन शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल ऊचलत आहे

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती