माळेगावात मासिक सभा होत नसल्याने सरपंच ग्रामसेवकावर कारवाई करण्याची ग्राम पंचायत सदस्यांची गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार


मंठा प्रतिनिधी(सुभाष वायाळ)
 मंठा तालुक्यातील माळेगाव येथे गेल्या वर्षभरापासून मासिक सभा झाली नसल्याने तसेच दि. २० जानेवारी २०२२ रोजी मासिक सभेची नोटिस देऊनही मासिक सभा झाली नसल्याने सरपंच आणि ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार वाढला आहे. यामुळे गावाच्या विकासाला खीळ बसत बसत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी चार ग्रामपंचायत सदस्य यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती मंठा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की माळेगाव ता. मंठा येथील ग्राम पंचायत मध्ये फेब्रुवारी २०२१ ते जानेवारी २०२२ या कार्यकाळामध्ये ग्रामसेवक तथा सरपंच यांनी आजपर्यंत कुठल्याही मासिक सभेला ठरावाच्या मासिक मिटींगसाठी विश्वासात घेतले नाही. तसेच दि.१७ जानेवारी २०२२ रोजी ग्रामसेवक व सरपंच यांनी त्यांच्या सही शिक्यानिशी मासिक सभेची नोटीस दि. २०/०१/२०२२ रोजी साडे अकरा वाजता ग्रा.पं. कार्यालयामध्ये मासिक सभासाठी हजर राहण्याचे सांगितले होते. त्यानुसार आम्ही चार ग्रा.पं. सदस्य दि.२० जानेवारी २०२२ रोजी सकाळी अकरा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ग्रामसेवक तथा सरपंच यांची मासिक सभेसाठी वाट पाहत होतो. परंतू ग्रामसेवक व सरपंच हे मासिक सभेची नोटीस देउन स्वतः गैरहजर राहून सदरची ठरविलेली नियोजित मासिक सभा घेतली नाही. तसेच वारंवार ग्रामसेवक आणि सरपंच यांना फोन करीत होतो परंतू त्यांनी आमचा कॉल उचलला नाही व त्यानंतर मोबाईल बंद करून ठेवला. माळेगावत दि १० /२/ २०२१ पासून ते आजपर्यंत ग्राम पंचायतमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी एकही मासिक सभा घेतलेली नाही. याबाबत दि. ३०/९/ २०२१ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद जालना यांच्याकडे कुठलीही मासिक सभा न घेतल्या बाबत ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासन कोणतीही कारवाई केली नाही. यापुढे प्रशासनाने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर ग्रा.प. सदस्य लक्ष्मीबाई श्रीराम राठोड, इंदुबाई पंढरीनाथ चव्हाण, रोहित श्रीराम राठोड,अल्का विकास चव्हाण, यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
 
 
*चौकट*
*माळेगाव येथे गेल्या वर्षापासून मासिक सभा होत नाही. ग्रामसेवक गावात नियमित येत नाही. सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे गावकर्‍यांना शासनाच्या योजना गरजू पर्यंत पोहचत नसल्याने लाभ मिळत नाही. सरपंच व आणि ग्रामसेवकावर कारवाई झाली नाही तर आंदोलन करणार आहेत. 
रोहित श्रीराम राठोड, ग्रा.प. सदस्य माळेगाव*
 
 
*गावात मासिक सभा होत नसल्याने तसेच ग्रामसेवक येत नसल्याने ग्रामस्थांच्या अडि अडचणी कोणाकडे मांडायच्या सध्या कोरोना लाट असल्याने जनजागृती करून उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी मासिक सभा होणे अपेक्षित आहे. मासिक सभेची नोटिस देऊनही २० जानेवारी २०२२ रोजी मासिक सभा झाली नाही. ग्रामपंचायतचा मनमानी कारभार वाढला आहे. 
लक्ष्मीबाई श्रीराम राठोड, ग्रा.प. सदस्य माळेगाव*  
 
 

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती