स्वातंत्र्यपूर्व काळापासून देश विकासात पत्रकारांची भूमिका महत्वाची-. माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर. दर्पण दिनानिमित्त भाजपा, माऊली अर्बन पतसंस्थेच्या वतीने पत्रकारांचा गौरव


 प्रतिनिधी(रवी पाटील) स्वातंत्र्यपूर्व काळापासून देश विकासात पत्रकारांची भूमिका महत्वाची राहिली आहे. स्वतंत्रपूर्व काळात दर्पणकार बाळशास्त्री बाळकृष्ण जांभेकर यांनी तात्कालीन इंग्रज राजवटीला आपल्या लेखणीतून सळो की पळो करून सोडले होते. समाज प्रबोधन करून स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजी सरकारला झुकवण्याची पत्रकारिता जांभेकेरान सोबतच स्वातंत्रपूर्व लढ्यातील पत्रकारांनी पार पाडलेली आहे. त्यामुळे देश विकासात पत्रकारांची भूमिका महत्वाची राहिली आहे.असे प्रतिपादन माजीमंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी केले.ते भारतीय जनता पार्टी व माऊली अर्पण पतसंसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दर्पण दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
(ता.7) शुक्रवार रोजी माऊली इग्लिश स्कूल येथील आयोजित या कार्यक्रमात व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप गोरे, आयोजक,भाजपा तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक सतीशराव निर्वळ,बाजार समितीचे संचालक निवासराव देशमुख,प्रसाद बोराडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी कुलकर्णी, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नागेशराव कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार पंडितराव बोराडे, बाबूजी तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आ.लोणीकर बोलताना पुढे म्हणाले की, माझा राजकीय कारकीर्दीत अनेक पत्रकारांनी मला आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून बातमीतून देखील सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे मी त्यांचा कधी आकस न करता त्यांच्या सूचनांना प्राधान्य देऊन त्या सुधारण्याचा प्रयत्न केला. समाजातील चांगल्या-वाईट दोन्ही बाजूचे समर्थपणे मानण्याचे काम पत्रकार करत असतात. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव होणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. असे बोलून सर्व पत्रकारांचा शाल, हार व दिनदर्शिका देऊ सत्कार करण्यात आला.या वेळी बाबूजी तिवारी,बाबासाहेब कुलकर्णी,संतोष दायमा,प्रदीप देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी पत्रकार राजेश भुतेकर,रवी पाटील,कृष्णा भावसार,आरून राठोड,तुकाराम मुळे,डॉ.आशीष तिवारी,केशव येऊल,अनिल खंदारे,रणजित बोराडे, रघुसिंग जनकवार,
सो.मंजुषा काळे,आसाराम शेळके,अतुल खरात,हाफिज शबाब बागवान,मानसिंह बोराडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्य बोलताना माऊली अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष सतीशराव निर्वल म्हणले की, मंठा तालुक्यातील पत्रकार हे सातत्याने माऊली अर्बन पतसंस्था,माऊली इंग्लिश स्कूल तसेच माझ्या सर्व सामाजिक कार्यात आवर्जून सहभागी होतात. त्यामुळे मला सातत्याने नवनवीन उपक्रम घेण्याची इच्छाशक्ती मिळत राहते असे बोलून सर्व उपस्थित पत्रकारांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माऊली अर्बन पतसंस्थेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माऊली इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अमोल कुलकर्णी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार श्री बोराडे यांनी मानले.
---------------------------------------------------------

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती