तळणी येथे नूतन शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांच्या सत्कार संपन्न

  

तळणी (रवी पाटील):-  मंठा तालुक्यातील तळणी येथील केंद्रीय प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भागवत शिवाजी मूर्तडकर तर उपाध्यक्षपदी सौ.मंगल प्रभुसिंग चव्हाण यांची निवड यांची करण्यात आली आहे. पालक सभेतून निवडलेल्या सदस्यांमधून सर्वानुमते ही निवड करण्यात आली आहे. शनिवारी कोरोना विषयक सर्व नियमावलीचे पालन करून शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. निवडी नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री.जे.डी. इंगळे सर यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांचा सत्कार केला आहे.

पालक सभेतून सदस्य निवडीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला उपसरपंच श्री.सुधाकर सरकटे, ग्रामपंचायत सदस्य श्री.अमोल सरकटे, केंद्रीय मुख्याध्यापक श्री.जे.डी. इंगळे सर, शिक्षक आर.जी.खंदारे, डी. टी. शिंदे, पी.जे.वराडे, जी.ए. धारतरकर, एस.बी.गारोळे,ए. डी. आकाळ, एस.एस.येलेकर आदींसह गावकऱ्यांची  उपस्थिती होती.  नवनियुक्त शालेय व्यवस्थापन समिती मध्ये अध्यक्ष भागवत मूर्तडकर, उपाध्यक्ष सौ.मंगल चव्हाण, सदस्य सुप्रिया जोशी, सोपान सरकटे, सौ.सुनीता कुकडे, ज्ञानेश्वर चौकसकर,रफिक शेख,सौ.अनुराधा हानवते ,गजानन लाड, शिक्षणतज्ञ अमोल सरकटे यांचा समावेश आहे.
यावेळी सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. जे.डी.इंगळे सर तर प्रमुख पाहुणे उपसरपंच श्री.सुधाकर सरकटे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. वराडे सर यांनी केले.सूत्रसंचालन श्री.गारोळे सर यांनी तर आभार श्री.शिंदे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व पालक व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण