राणी वाहेगाव येथील वंजारे कुटुंबाला ,कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 20,000 हजाराची मदत....====.=====


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
       परतूर तालुक्यातील राणी वाहेगाव येथील स्व. मुंजाजी वंजारे यांना कुटुंबअर्थसाह्य योजनेतून वीस हजार रुपयाचा धनादेश स्व.मुंजाजी वंजारे यांची पत्नी लक्ष्मीबाई
वंजारे यांना संजय गांधी निराधार समिती सदस्य आबासाहेब कदम यांच्या हस्ते धनादेश  देण्यात आला .यावेळी उपस्थित तहसील कार्यालयाचे कुलकर्णी साहेब ,शिंगाडे साहेब ,सराफ मॅडम ,प्रमोद कुलथे, तसेच धनादेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर संजय गांधी निराधार समिती सदस्य आबासाहेब कदम यांनी सांगितले की या अर्थसाह्य योजनेचा ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनेची माहिती व्हावी असे ते म्हणाले  त्याबद्दल त्यांनी माहिती  सांगितली की,
राज्य शासनाच्या राष्ट्रीय अर्थसाह्य योजनेअंतर्गत विविध योजना अंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी करून लाभार्थ्याची निवड करण्यात येऊन सर्व शासकीय नियमांचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरच प्राप्त लाभार्थ्याची निवड करण्यात येते. संबंधित विभागाला या योजनेचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर या योजनेमध्ये कुटुंबा अर्थसाह्य  योजनेत नियमानुसार 18 वर्षे ते 59 वर्षापर्यंतच्या कुटुंबप्रमुखाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला तातडीने 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूने हादरलेल्या कुटुंबालाही मदत आपत्ती काळात अत्यंत मोलाची ठरते.
एखाद्या कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला असून, कुटुंब निराधार झाले असेल, तर ‘राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजने’द्वारे या कुटुंबांना सरकारकडून निधी मिळतो.
 या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अत्यल्प (१५००० किंवा त्यापेक्षा कमी) असेल तरच या योजनेचा लाभ मिळतो.
या योजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयात अर्ज करता
येतो.
 अर्जासोबत कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
कुटुंबप्रमुखाचा मृत्यू नैसर्गिक वा अपघाती झाला असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, तसेच जन्म-मृत्यू नोंदणीचा दाखला आवश्यक आहे.
मृत व्यक्ती कुटुंबप्रमुख होती, त्या संदर्भातील तलाठय़ांकडून मिळणारा दाखलाही जोडणे आवश्यक
त्याशिवाय रहिवासी प्रमाणपत्र, ओळखपत्र, वारसा प्रमाणपत्र, कुटुंब दारिद्रय़रेषेखालील
असल्यास त्याचा दाखला आदी जोडणे आवश्यक
आहे.

Popular posts from this blog

हातडी शिवारात बिबट्याची भटकंती;शेतकर्‍यात भितीचे वातावरण,शोधमोहिम सुरू शेतकर्‍यांना काळजी घेण्याचे आवाहन

परतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि