राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. “मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला बसणार .....===================


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
 खा. छ. संभाजीराजे मुंबईतील आझाद मैदानात उपोषण ला
 बसणार असल्याचं”, म्हणत संभाजीराजेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवार रोजी संभाजीराजे हे मुंबईत
बोलत होते.
खासदार संभाजीराजेंची मोठी घोषणा! ‘मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार’
छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, “मी मराठा आहे म्हणून मराठा आरक्षणासाठी लढतो आहे असं नाही. 5 मे 2021 ला आरक्षण रद्द झालं. मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलनं केली. परंतू अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही. मी आतापर्यंत आक्रमक होतो परंतु आता मी उद्विग्न झालो असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. तसेच, 2007 पासून मी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाजही वंचित घटक आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली असल्याचंही ते म्हणाले.”
पुढे संभाजीराजे म्हणाले, “मी नेहमीच शाहू महाराजांचा वारसा जपला आहे. मी सर्वांना घेऊन जाणारा माणूस आहे. आम्हाला टिकणारे आरक्षण हवे आहे, तशी आम्ही वेळोवेळी मागणीही केली आहे. सर्व पक्षाच्या नेत्यांना आरक्षण कशामुळे गेलं हेही सांगितले आहे. तसेच, समन्वयक यांनी मला टोकाची भूमिका घेऊ नका असे सांगितले होते. पण, सरकार याबाबत काहीही हालचाल करताना दिसत नाही. त्यामुळे माझी भूमिका आता मी बदलत आहे. येत्या 26 फेब्रुवारीला मी स्वत: आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे ते म्हणाले.”

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान