छत्रपती शिवरायांच्या नावाने मिळालेल्या पुरस्कारामुळे जीवनातील सर्वोच्च आनंद झाला- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर आमदार बबनराव लोणीकर यांना ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या हस्ते पुरस्कार करण्यात आला प्रदान



परतूर  प्रतिनिधी/हनुमंत दवंडे 
छत्रपती शिवरायांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याने आपण कृतार्थ झालो असून मिळालेल्या पुरस्कारामुळे आपणास जीवनातील सर्वोच्च आनंद झाला असून आज हा पुरस्कार हिंदुत्ववादी विचाराचे पुरस्कर्ते समाजातील प्रत्येक व्यंगावर भाष्य करणारे ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या शुभ हस्ते मिळाला हे माझे भाग्य असल्याचे मत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले
    ते अकोली येथील मातोश्री सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या शिवछत्रपती पुरस्कार वितरण समारंभा प्रसंगीबोलत होते
  पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की, संस्कार हे माता-पित्याच्या शिकवणीतून मिळत असतात या संस्काराला साजेशी क्या संस्काराला साजेशे काम आजच्या युवा पिढीने करणे गरजेचे असून आज अकोली च्या तुकाराम सोळंके अध्यक्ष असलेल्या मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने जो गौरव केला त्याबद्दल आपण त्यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो गेल्या  35 वर्षांमध्ये राजकीय पटलावर काम करीत असताना जनसामान्यांची सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य असून आज या पुरस्काराने अकोलीकरांनी खऱ्या अर्थाने मी केलेल्या सेवेचा छत्रपती शिवरायांचा पुरस्कार देऊन केलेला गौरव आपण मनस्वी स्वीकारत असल्याचे त्यांनी यावेळी केले
 ==================
*केलेल्या जनसेवे मुळे आपण समाधानी*
===================
आपण आयुष्यभर जनसामान्यांचे अश्रू पुसण्यासाठी काम केले हे करीत असताना मतदार संघातील11000  च्या वर विधवा अपंग निराधारांना मानधन सुरू केले हे करीत असतानाच आपण मंत्री असताना राज्यभरात 70 लाख गोरगरिबांना शौचालय उपलब्ध करून दिले तसेच पाणीपुरवठ्याचा भार सांभाळताना 18000 गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या योजना केल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये 300 गावांची एकत्रित वॉटर बीड केली आज 150 च्या वर गावांना वॉटर फिल्टर चे पाणी पिण्यास मिळत आहे, शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग मतदार संघातून आणण्यासाठी नितीन गडकरींना साकडे घातले व  संत गजानन महाराज यांच्या शेगाव पासून ते पंढरपूर च्या विठुराया पर्यंत चा दिंडी मार्ग मंजूर करून घेतला आज त्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे 
    जेवलात का आपण राजकारणात आलो नसतो तर नक्कीच समाज प्रबोधनकार कीर्तनकार म्हणून  जनतेची सेवा केली असती असेही या वेळी आमदार लोणीकर यांनी सांगितले 
 *पांडुरंग कृपेने समाज उन्नतीचे काम लोणीकर यांनी आयुष्यभर केले*
*ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील*
===================
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे आणि माझी ऋणानुबंध अनेक वर्षापासून असून त्यांच्या अचाट कार्यक्षमता पाहून आपणास हेवा वाटतो अशा प्रकारचे उद्गार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी यावेळी काढले 
किर्तन निरुपणाच्या निमित्ताने मला माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर सारख्या समाज सेवकाचा सन्मान करण्याचे भाग्य मिळाले यामुळे मी आत्मिक समाधानी असून मी ज्यांना पुरस्कार दिला आहे ते माजी मंत्री लोणीकर यांनी आयुष्यभर संघर्ष करत जनसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे
 त्या मुळे त्यांचा सन्मान करणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद असल्याचे ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी यावेळी नमूद केले
===================
*माजी मंत्री आमदार लोणीकर यांनी केलेल्या सर्वसामान्यांच्या भावनांची जान असल्याने केला सन्मान*
- *तुकाराम सोळंके*
===================
गेल्या पस्तीस वर्षांपासून माजी मंत्री आमदार लोणीकर यांनी लोकसेवा करत सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थाने आधार दिला असून माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांच्यावर निस्सीम प्रेम करतात त्यांच्या कर्तृत्ववान  कारकिर्दीचा सन्मान करणे हे आमच्यासाठी अतिशय हृदयस्पर्शी क्षण असून त्यांच्या सन्मानासाठी आपण केलेला हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे यावेळी मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम सोळंके यांनी सांगितले 
  या वेळी युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर, मधुकर राजे आर्दड रमेश राव बापकर छत्रगुन कणसे संपत टकले विष्णू काका शहाणे ऍड राजेश आंभुरे दिलीप अण्णा थोरात बबलू सातपुते अनंता आगलावे मधुकर मोरे गांजाळे बाबाराव थोरात अमोल जोशी बळी थोरात माऊली सोळं के रवी सोळंके नसरुल्लाह काकड प्रकाश राव चव्हाण कृष्णा आरगडे राजेश भुजबळ प्रविन सातोनकर  रंगनाथराव येवले रामप्रसाद थोरात सर हरी रामजी माने सुरेश दादा सोळंके दिगंबर मुजमुले बंकट नाना सोळुंके, कृष्णा टेकाळे राजेंद्र बाहिती डॉ उंबरे सरकटे वाघमारे मुजीब भाई मधुकर मोरे मुरली राठोड रमेश राठोड महादेव वाघमारे कृष्णा मोठे एजाज जमीनदार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती