छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सर्वसमावेशक, त्यामुळेच आमची भूमिका "सबका साथ सबका विकास" - राहुल लोणीकर

 परतूर प्रतिनिधी /हनुमंत दवंडे 
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन सर्वांच्या विकासाचा प्रयत्न करणारे होते सर्वसमावेशक स्वरूपाचा विचार त्या काळात देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडला आणि तो आदर्श घेऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास हीच भूमिका आमची असून कुठल्याही प्रकारे जातीय सलोखा बिघडणार नाही शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही अशी सर्वांची भूमिका आहे त्यामुळे प्रशासनाने सहकार्य करावे व पुतळ्याला अधिकृत परवानगी मिळवून देण्यासाठी आवश्यक ती मदत करावी अशा शब्दात राहुल लोणीकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली 

यावेळी श्री राहुल लोणीकर यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला असून त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तर सरपंच शेख नवीद ग्रामपंचायत सदस्य अजीम पटेल यांच्या हस्ते नारळ फोडून पुतळ्यासाठी अधिकृतपणे सर्व ग्रामस्थ सहमत असल्याचे दाखवून दिले

आम्ही "सबका साथ सबका विकास" या विचाराचे पाईक असून राजकारण किंवा समाजकारण करत असताना कधीही जातीपातीचा विचार केला नाही त्यामुळे सर्वसमावेशक असा विचार करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी सर्वांनी एकदिलाने एक विचारने संमती दिल्याबद्दल राहुल लोणीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले व कौतुक केले

यावेळी ज्ञानेश्वर शेजुळ जिजाबाई जाधव प्रकाश टकले विकास पालवे शेख नवीद अजीम पटेल नईम पटेल मुन्ना पटेल फरहान अन्सारी डॉ.शरद पालवे दिलीप जोशी कोमल कुचेरया शिवराज तळेकर समाधान वाघमारे प्रमोद भालेकर गजानन महाजन सौरभ माहुरकर  विठ्ठल मोरे बाबु शिंदे गणेश मोरे रामेश्वर काकडे दिलीप बानाईत अच्युत अंभोरे माऊली क्षीरसागर विक्रम उफाड गजानन उफाड राजू पवार विनोद राठोड जालिंदर राठोड रामदास ढाकणे यांच्यासह माता-भगिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
=====================
*पुतळ्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्यांसाठी प्रशासनाने सहकार्य करावे - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर*
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनेक पुतळे उभारण्यात आले आहेत काही प्राण्यांना तर स्थानिक लोकांचा देखील विरोध आहे परंतु तरी देखील ते सर्व पुतळे आजही दिमाखात उभे आहेत सर्व गावकऱ्यांचे सहमती असताना देखील हा पुतळा हटवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केल्यास संपूर्ण जिल्हाभर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन केले जाईल तसेच विधानसभेमध्ये देखील याबाबत प्रश्न उपस्थित केला जाईल परिणामी प्रशासनाने जनतेच्या मना विरुद्ध वागण्याचा प्रयत्न करू नये केल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीला तसेच ती घडणाऱ्या शांतता आणि सुव्यवस्थेला पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देखील यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिला.

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश