सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतूर ग्रामीण रुग्णालय येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतूर ग्रामीण रुग्णालय येथे परिसरातील स्वच्छता करून राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना कृष्णा आरगडे नगरसेवक यांनी सांगितले की,
             महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार गाडगे महाराज यांची आज२३ फेब्रुवारी रोजी जयंती साजरी करण्यात आली. गाडगेबाबा यांनी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचं उच्चाटन हेच गाडगेबाबांचे ध्येय होते. दुर्बल, अनाथ, अपंगांची ते नेहमी सेवा करायचे. संत गाडगेबाबा जिथे कुठे जायचे तेथील रस्ता स्वच्छ करण्याचे काम हाती घ्यायचे. गावातील अनेकांनी दिलेला पैसा त्यांनी समाजविकासाठी खर्च केला. या पैशांतून त्यांनी गावांमध्ये शाळा, धर्मशाळा, रुग्णालय आणि जनावरांसाठी निवारा बांधला. त्यांचे हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. 
गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगांव येथे झाला आहे. लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी हातीच्या खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरले. गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांना शिकवण दिली . असे प्रतिपादन नगरसेवक कृष्णा अरगडे यांनी केले आहे.या वेळी कार्यक्रमाला उपस्थित वैद्यकीय अधिकारी डाॅ. नवल , नगरसेवक राजेश खंडेलवाल, नगरसेवक ad. बागल, नगरसेवक, प्रकाश चव्हाण , नगरसेवक प्रविण सातोनकर, नगरसेवक कूष्णा आरगडे मा. नगराध्यक्ष आविनाश शहाणे ,नरेश कांबळे, गिरीष पैठकर ,डाॅ .संजय राऊत, राजू वाघमारे, सचिन खैरे ,उध्दव वाघमारे, पपू खैरे ,बालू वाघ, आशोक पवार ,इत्यादी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत