वाटुर फाटा येथे उद्या भव्य रोको आंदोलन,सेवली येथील पूतळा हटवल्या प्रकरणी तळणी येथे कडकडीत बंद



तळणी : (रवी पाटील )तळणी येथून जवळच व जालना तालुक्यातील सेवली येथे अत्यंत शांततापूर्ण वातावरणात सर्व धर्मीय लोकप्रतिनिधी व समाज बांधवांच्या एकोप्यातून, सर्वानुमते कोणतीही तेढ निर्माण न होता महाराष्ट्राचं नव्हे तर अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करण्यात आलं होतं पूजन करणाऱ्यांमध्ये सर्व जाती-धर्माच्या शिवप्रेमींचा समावेश होता....

तळणी येथे या घटनेचा पूर्णपणे निषेध करण्यात आला असून सकाळ पासूनच पूर्ण बाजारपेठ बंद होती व्यापाऱ्यानी या बंद मध्ये सहभाग नोदवून जिल्हा प्रशासनाच्या या कृत्तीचा निषेध केला 

*परंतु कोणताही वाद-विवाद नसताना संपूर्ण गावाची सहमती असताना सर्व लोकप्रतिनिधींची सहमती असताना कोणत्याही प्रकारची तक्रार नसताना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रात्री हटवण्यात आला या गोष्टीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विनापरवानगी अनेक महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आलेले आहेत परंतु केवळ रजाकारी प्रवृत्तीच्या सरकारच्या आदेशाने हा पुतळा हटवण्यात आला ही बाब प्रत्येक शिवप्रेमींच्या मनाला लागणारी आणि भावना दुखावणारी आहे अशी प्रतीक्रीया माजी मंत्री बबन राव लोणीकर यानी तळणी येथे दीली*

या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ वाटुर फाटा या ठिकाणी *माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वात भव्य रास्ता रोको गुरुवारी करण्यात येणार आहे*
 तळणी येथे झालेल्या निषेध बैठकीत आमदार बबनराव लोणीकरता गजानन देशमुख केशव महाराज सरकटे बबन दादा सरकटे  नितीन सरकटे अशोक राठोड उपसरपंच सुधाकर सरकटे व मोठया प्रमाणात शिवप्रेमी हजर होते जिल्हा प्रशासनाचा निषेध म्हणून मंठा  ता  अध्यक्ष सतिशराव निर्वळ यांच्या नेतूत्वाखाली मंठा  तहसीलदाराला निवेदन देऊन मंठा भाजपाच्या वतीने निषेध करण्यात आलातळणी येथे शिवप्रेमीन कडून निषेध करण्यात आला 

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती