आयटा तर्फे सरफराज कायमखानीचा सत्कार

परतुर (हनुमंत दवंडे ) वरफल येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व विस्तार अधिकारी श्री सरफराज कायमखानीचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
आलं इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन परतुरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आयटाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शेख अब्दुल रहीम चे अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम ची सुरुवात सय्यद आरेफ ने पवित्र कुराण पठण करून केला प्रस्तावित नसीर खतीब ने मांडला.या वेळी शरीफ पठाण, शेख नवाज माजी जिल्हाध्यक्ष आयटा ,कलिम तांबोळी, शेख ताहेर ने आपले मनोगत व्यक्त केले ,व  सरफराज कायमखानीसरानी आपल्या सेवा काळचे अनुभव व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात शेख अब्दुल रहीम साहेबांनी ने आयटा संघटनेच्या परीचय देऊन याचे धोरण समजून आयटा मध्ये सामील व्हा असे आवाहन केले.व सरफराज कायमखानीसरा सारखं सर्वगुणसंपन्न शिक्षक चा उपयोग करून घेतला पाहिजे असं मत व्यक्त केले. या वेळी शेख मुकसिद, मुख्तार बागवान, इरफान देशमुख, व इतर शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन देशमुख काशिफ जिल्हाध्यक्ष आयटा जालना व आभार प्रदर्शन शेख अब्दुल्ला यांनी व्यक्त केले

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत