शर्मा क्रिकेट ॲकॅडमी चे चार खेळाडू अंडर फोर्टीनच्या जालना जिह्वा संघात

 परतूर प्रतिनिधी (हनुमंत दवंडे ) येथील शर्मा क्रिकेट अकॅडमी चे चार खेळाडू अंडर फोर्टीन जालना जिल्ह्याच्या संघात समावेश झाला आहे पुणे येथे होणाऱ्या जिल्हाअंतर्गत अंडर फोर्टीन च्या स्पर्धा होणार असून यामध्ये जालना जिल्ह्याचा संघ खेळणार आहे
     परतुर येथील शर्मा क्रिकेट  अकॅडमी चे विश्वजीत बन अनुराग बन अर्णव आकात दर्शन मुजमुले या चार खेळाडूंचा समावेश झालेला आहे
     यासंदर्भात शर्मा क्रिकेट अकॅडमी  चे संचालक तथा शिक्षक संतोष शर्मा यांनी सांगितले की या स्पर्धेत हे चारही खेळाडू निवडकर्ते याचे लक्ष वेधतील व पुढील स्पर्धेसाठी पात्र होतील असे मत त्यांनी व्यक्त केले
पुढे बोलताना सांगितले या चारी खेळाडूंना शर्मा अकॅडमी सोबतच बीसीसीआयचे अजिव सभासद राजू काणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे या खेळाडूंसाठी फार अभिमानास्पद गोष्ट असून नेहमीच राजू काणे यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी प्राप्त करून दिलेली आहे काणे सर यांनी सय्यद शोयब  सारख्या हा अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत मधल्या खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट संघात संधी प्राप्त करून दिली यापुढेही असे खेळाडू ग्रामीण भागातील खेळाडूंना नवीन नवीन संधी राजू काणे यांच्या मार्फत प्राप्त करून दिली जाईल असे शेवटी हम तो शर्मा यांनी सांगितले
   या निवडी बद्दल आमदार बबनराव लोणीकर माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर कृउबा सभापती कपिल आकात शिवसेना जिल्हा संघटक मोहन अग्रवाल माधवराव मामा कदम बाबासाहेब तेलगड बाबासाहेब गाडगे  प्रकाश चव्हाण क्रिश आरडे प्रवीण सातोनकर छत्रगुन कणसे महेश नळगे आदींनी अभिनंदन केले

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती