जिल्हाधिकार्याच्या पथकासह तलाठी नितीन चिचोले याची वाळू घाटातून भरून आलेल्या नऊ हायवावर कारवाई,कारवाई दरम्यान तहसीलदार गायब


तळणी प्रतिनिधी रवी पाटील 
लिलाव झालेल्या वाळू घाटातील नऊ हायवावर जिल्हाधिकार्याच्या पथकासह तळणी सज्जाचे तलाठी नितीन चिचोले यानी भल्या पहाटे येऊन कार्यवाही केली पंरतू या कारवाई दरम्यान मंठा तहसीलदार कैलास वाघमारे गायब दीसले पूर्णा नदीपात्रातील एकूण चार वाळू घाटाचा लिलाव झाला असून सुरवातीपासूनच जास्तीची वाळू वाहतूक मोठ्या वाहनाद्वारे होत असून वाळू वाहतूकीची रॉंयल्टी माञ कमी ब्रासची घेतली जात असल्याने अतिरीक्त वाळूचा ऊपसा हा लिलाव धारकांकडून होत आहे सदरील पथक हे सकाळीच कोणालाही सुगावा न लागू देता तळणी लोणार मंठा रोडवर आल्याची कल्पना कोणालाच नसल्या कारणाने ही मोठी कारवाई पथकाने केली पकडलेल्या नऊ हायवा कडे वाळू जास्त व पावत्या कमी असल्याने सदरील हायवा सुरवातीला तळणी पोलीस चौकी येथे लावण्यात आल्या नंतर मंठा पोलीसांच्या स्वाधीन करून सर्व गाडया मंठा तहसील मध्ये पाठवण्यात आल्या 

पथक आल्याचे समजताच अवैध वाळू वाहतुक करणारे वाहने ही तळणी गावात व इतरत्र आश्रयाला उभी राहुन पथक गेल्याचे विचारपूस करत होते सकाळी सहा पासून कारवाई सुरु होताच वाळू घाटातील वाहतूक व इतर ठिकाणची चोरटी वाहतूक बंद होती अचानक झालेल्या या कारवाई मुळे लीलावधारंकांची भंबेरी ऊडाली सध्य स्थितीत वाळू विकण्याची स्पर्धा मोठी जीवघेणी ठरत असून यावर नियञंण असणे गरजेचे आहे 

*मंठा तहसीलचे पोलीस प्रशासनाचे पथक गायब*
मंठा तहसीलदाराच पथक गायबच आहे त्याच्या पथकाकडून कारवाई झाल्याचे ऐकण्यात याऊलट विदर्भ हद्दीमध्ये जास्त कारवाया व चोरटया वाळू वाहतुक करणाऱ्याकडून जास्तीचा महसुल वसूल करण्यात येत आहे

या कारवाई दरम्यान पथकातील अधिकार्याना नावे सांगण्यास व पञकारांना माहीती देण्यास नकार दिला कारवाई दरम्यान बघ्याची मोठी गर्दी दिसताच पथकाने काढता पाय घेतला 

अवैध वाळू वाहतूकी दरम्यान सतत कारवाई चालू असून कारवाया करत असताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो वाळू माफीया सतत लक्ष ठेवत असतात व मनुष्य बळ कमी असल्याने अडचण येते 
 नितिन चिचोले तलाठी तळणी

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार