येनोरा येथील म्हसोबा यात्रा महोत्सव, जल्लोषात साजरा होणार..परतुर प्रतिनिधी :हनुमंत दवंडे
        परतुर तालुक्यातील येनोरा येथे दरवर्षी म्हसोबा महाराज यांची यात्रा भरत असते यामध्ये म्हसोबा ला काही जण नवस करतात तर काही घरी पुरण पोळीचा स्वयंपाक केला जातो, तसेच रूढी परंपरे नुसार गाड्या ओढण्याचा कार्यक्रम व दुसऱ्या दिवशी कुस्तीचा कार्यक्रम ही केला जातो .
यात्रा निमित्त गाडी ओढण्याचा कार्यक्रम मंगळवार दिनांक 23/ 3/ 2022 रोजी दुपारी 4:00 वाजता होणार आहे भव्य जंगी शंकरपट बुधवार दिनांक 24/ 3 22/ रोजी सकाळी 11 वाजता सुरू होईल. भव्य कुस्त्यांच्या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने कुस्तीचे प्रथम बक्षीस 11111 / रु. बक्षीस अशोक भीमराव गरड (शिक्षक) यांनी ठेवले आहे.कुस्ती चे द्वितीय7777 रु, बक्षीस एकनाथ शिंदे कुस्तीचे तृतीय बक्षीस 5555 रु. श्री. उमाशंकर द वंडे यांनी घोषित केले .चतुर्थ बक्षीस 4444 रू. रुपये,साहेबराव नवल श्री गायत्री ट्रेडर्स चे मालक. पाचवे बक्षीस श्री. बंडू अंबादास भूंबर( माजी सरपंच येनोरा)3333 रुपये, कुस्तीचे सहावे बक्षीस 2222/रू.श्री .प्रकाश बोंबले(मा. पं. सदस्य परतूर) कुस्तीचे सातवे बक्षीस सुंदर भूंबर 1111 रु. बक्षीस घोषित केले. अशा विविध आगळ्यावेगळ्या स्पर्धा म्हसोबा यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी कुस्त्याचा स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. व शंकरपट याचाही भव्य असा कार्यक्रम यात्रा महोत्सवानिमित्त होणार आहे अशी माहिती येनोरा पंच कमिटी च्या वतीने देण्यात आली आहे. तसेच
भव्य जंगी शंकरपट जनरल पट दिनांक 23 /3 /2020 वार बुधवार रोजी स्पर्धाआयोजित करण्यात आली आहे. भव्य जंगी शंकरपट प्रथम बक्षीस संपत टकले (भाजपा युवा मोर्चा महामंत्री जालना )यांच्याकडून 15000/हजार रुपये, शत्रुघ्न कनसे (भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष परतूर) 10000हजार रु , नितीन जोगदंड 7000/ हजार रु ,विष्णु गायकवाड (ये नोरा ग्राम पंचायत सरपंच) 6000 हजार रु, उध्दव जोगदंड (शिक्षक)5500 /रु., सुभाषराव भूंबर 5000/रु., रामभाऊ भूंबर (उपसरपंच येनोरा) 4500/रु, सुरेश भूंबर(माजी उपसपंच येनोरा)4000 हजार रू. अशोक भुंबर 3500 रु., अर्जुन द वंडे(शा. स. अध्यक्ष येनोरा) अशोक शेळके (शा. स. उप अध्यक्ष येनोरा)2500/रु, अंगद भूंबर 2500/रु., रामदास भुंबर 2300/रु., मदन जोगदंड 2100/रु., विजय भुंबरं 2000/हजार रु. अशा पद्धतीने शंकर पटाचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे . सर्व अधिकार पंच कमिटी ने राखून ठेवले आहे. जीविताची हानी ज्याची त्याच्यावर राहील पंचाचा निर्णय अंतिम राहील .तसेच पंचकमिटी च्या वतीने टीपरू भाला जादू पुरवणी बंद राहील असे आवाहन ही पंच कमिटीने केले आहे.

Popular posts from this blog

हातडी शिवारात बिबट्याची भटकंती;शेतकर्‍यात भितीचे वातावरण,शोधमोहिम सुरू शेतकर्‍यांना काळजी घेण्याचे आवाहन

परतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि