खंदारे दहिफळ येथे तीन दीवशीय गीता रामायण ज्ञानयज्ञ सप्ताहचे आयोजन

तळणी : ( रवि पाटील ) तळणी येथून जवळच असलेल्या दहीफळ खंदारे येथे तीन दीवशीय गीता रामायण ज्ञानयज्ञ सप्ताहचे आयोजन करण्यात आले असून प पू राष्ट्रीय संत श्री लक्षण चैतन्य बापूजी यांचे कृप्राप्राप्त शिष्य श्री आंनद चैतन्यजी महाराज याच्या सुमधूर वाणीतून या तीन दीवशीय संत्संगाचे आयोजन करण्यात आले 

मनुष्याच्या जीवनात नामसकीर्तन महत्वाचे असुन नामालाच साधन बनवने गरजेचे आहे आपल्या आयुष्यात जर आपण कोणा विषयी द्वेश भावना ठेवली नाही तर त्या मनुष्या ईतका ज्ञानी मनुष्य समाजात दुसरा कोणी नाही हा मनुष्य जन्म एकदाच आहे तो एकदाच मनुष्याला मिळाला आहे त्याचे मोल मनुष्यानेच ठरवायचे आहे मनुष्याने दीवसातून तीन वेळा मूत्यूला आठवले पाहीजे ससांरात सगळ्यात मोठे आश्चर्य हे मुत्यू आहे स्वःत मृत्यू ची तीथी फक्त सतच सांगू शकतात तो अधिकार फक्त् संतानाच आहे म्हणून सध्या च्या या कल युगात मनुष्याने संतांने दाखवून दीलेल्या मार्गावर चालणे गरजेचे आहे 

राम आणि श्रीकृष्ण आपले आदर्श आहे त्या आदर्शावर जर आपण चाललो तर जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही सध्याच्या या युगात सत्कर्म करण्यासाठी वेळ वाया घालवू नका कारण मनुष्याच्या भरोसा नाही ईच्छा होईल तेव्हाच ते सत्कर्म सुरू करा वाईट विचाराना आयुष्यात स्थान देऊ नका ते म्हणात ते स्वीकारू नका त्याचा तीरस्कार करा द्वेष व्रत्ती ही मनुष्याच्या वृत्ती शोभणारी नाही चंचल मनाला आवर घालण्यासाठी संत्संगाची खरी गरज आहे आत्मा आणि परमात्मा एकच आहे जीव आणि शिव एकच आहे पण यांना संत्संगाच्या प्रवासाची गरज आहे 

हंस जशे दुधातील पाणी सेवन करत नाही तो दुधच सेवन करतो तसेच परमार्थ रूपी जीवन जगनारा मनुष्य कितीही संसार रुपी चिखलात रुतलेला असलेला तरी तो भगवत भक्ती मार्ग सोडत नाही संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत मीरा संत जनाबाई हे अमर झाली आहेत धर्म मोक्ष काम या संगळ्या साठी यां संताचे मोठे योगदान आहे महाराष्ट्र ही संताची भूमी आहे वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान महाराष्ट्रासाठी आहे संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम यांनी ज्ञान वैराग्य भक्ती शिकवली ती स्वीकारून मनुष्य जीवनाचे सार्थक करा जर राञ नसती तर दीव्याचे महत्व कळाले नसते तसेच मनुष्याच्या जीवनात संत नसते ते जीवन अंधकारमय जीवन जगले असते  

प्रत्येक भारतीयांच्या आयुष्यात राम आणि कृष्ण आहेत ते जर काढून टाकले तर जीवन शून्य आहे तुमचे आमचे जीवन राममय कृष्ण मय झाले पाहीजे तरच त्या जीवनाला अर्थ आहे अर्जुनाने सुद्धा देवाच्या आशीर्वादानेच धर्म युध्द जिंकले होते पंरतू काही लोक धर्म मानू नका अशा अपप्रचार करू लागली स्वःतच्या फायद्यासाठी या अधर्मी लोकांपासून दुर राहणे गरजेच आहे 
*सत्संगाच्या ठिकाणी लता दीदीचे स्मरण*

या सत्संगाच्या वेळी बोलताना श्री आनंद चैतन्य बापू नी लता दीदी च्या सुमधूर गाण्यांनीच आपल्याला प्रेम करायला शिकवले आहे लता दीदी नसत्या तर त्याची कल्पना करा नवीन गाण्याचा अर्थ हा समजण्या पलीकडे आहे

सत्संगाचा आज पहीला दीवस वाटूर फाटया पासून ते दहीफळ खंदारे पर्यन्त शोभा याञचे सुंदर नियोजन करण्यात आले होते ठिकठिकाणी बापूजीचे स्वागत करण्यात आले

 संत सेवालाल महाराज देवीचे उपासक होते संत सेवालाल महाराजांनी खूप कष्ट सोसले आहे त्याचे धर्मकार्य मोठे आहे समाजाला योग्य दीशेने चालावे यासाठी त्यानी घालून दीलेल्या भक्ती मार्गावर समाजाने चालावे यातच समाजाचे भले आहे

Popular posts from this blog

हातडी शिवारात बिबट्याची भटकंती;शेतकर्‍यात भितीचे वातावरण,शोधमोहिम सुरू शेतकर्‍यांना काळजी घेण्याचे आवाहन

परतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि