शिवरायांनी ३५ वर्षात साडे सातशे वर्षाचं पारतंत्र्य संपवलं –प्रा.नितीन बानगुडे पाटील,परतूर तालुका शिवसेनेच्या वतीने शिवजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन




परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
        ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी यशाचा मूलमंत्र आपल्या कार्यकर्तृत्वातून आपल्यासमोर ठेवला आहे. जगात स्वतःला आर्थिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज्याच्या व्यवस्थापनाचे धडे आजही शिकविले जात आहे. माणसाला हवं तिथं पोहचता येत, मात्र यासाठी केवळ विचार करून चालत नाही तर प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करणे गरजेचे असल्याचे मत सुप्रसिद्ध व्यख्याते तथा शिवसेनेचे उपनेते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब तेलगड यांच्या पुढाकारातून शक्रवारी सायंकाळी ७ वाजता शहरातील वरद विनायक लोन्स येथे आयोजित व्याखानात ते बोलत होते. यावेळी परभणी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार संजय जाधव, जालना जिल्हा प्रमुख ए.जे.पाटील बोराडे,युवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, जिल्हा संघटक मोहनकुमार अग्रवाल, रामेश्वर नळगे, तालुकाप्रमुख अशोकराव आघाव,सुदर्शन सोळंके, शहर विदुर जईद आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

          याच कार्यक्रमात समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.नेत्रसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असणारे लायन्स क्लबचे मनोहर खालापुरे, कारगिल युद्धात देशाच्या सीमेवर कामगिरी बजावणारे भारतीय सैन्यातील जवान तुकाराम उबाळे, वारकरी संप्रदायात तालुक्याचे नाव राज्यपातळीवर गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. रूपालीताई सवने परतूरकर, सेवासाधना गुरुकुलचे प्रदीप कातारे, उपक्रमशील शिक्षक पिंटू मैसनवाड, संत नामदेवांच्या साहित्यावर संशोधन करणारे शेषराव वायाळ, कविता गायनासाठी प्रसिद्ध खांडवी येथील श्रावणी बरकुले यांचा समावेश आहे.

      या कार्यक्रमाला परतूर शहर आणि परीसरातील नागरिकांसह महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिका-यांनी परिश्रम घेतले

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती