महिला दिनानिमित्त परतूर येथील विवेकानंद इंग्रजी शाळेच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन. स्पर्धेमुळे महिलांच्या लहानपणीच्या आठवणी ताज्यापरतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
 येथील विवेकानंद सेवा केंद्र संचलित विवेकानंद इंग्लिश स्कूल व विवेकानंद पब्लिक स्कूल परतुर येथे महिला दिनानिमित्त 12 मार्च रोजी उत्साहात स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची पालकांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेला शहरातील पालकांनी महिला पालकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे पाहण्यास मिळाले अनेक महिलांनी आपल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्या म्हणून मंदाताई लोणीकर विवेकानंद शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता शिंदे, नगरसेवक संदीप बाहेकर,उपस्थित होते.
 दरम्यान महिला ही आज विविध क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा देत आज आपले अस्तित्व सिद्ध करतांना आपल्याला दिसून येत आहे,परंतु हे करत असताना आज कुठे तरी त्यांचे बालपण ,लहानपण त्या विसरू नये या अनुषंगाने त्यांच्यातील बालपण परत जागी करण्यासाठी अशा विविध प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून करण्यात आले होते. 
या कार्यक्रमांमध्ये खास करून पाककला स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा नृत्य स्पर्धा, चे आयोजन केले होते.यावेळी महिला पालकांसाठी येथील नितीन दीक्षित यांच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाने रंगत आणली या कार्यक्रमात मानाच्या ठरलेला महिलेसाठी खास पैठणी साडी आणि सोन्याची नथ आकर्षक पारितोषिक ठेवण्यात आले होते. त्याचा बहुमान येथील कोमल विशाल वायाळ यांना मिळाला. यावेळी उपस्थित डॉ संध्या कराड.डॉ अर्चना उमरे, डॉक्टर प्रीती तापडिया, डॉ उज्वला काळे, डॉ आंबेकर,डॉ पुनम लाहोटी, डॉ आलीस फातेमा, पल्लवी वाघमारे, स्मिता शर्मा, प्रतिभा घनवट,तेजस्विनी कुणाल, आरती पवार, सोनाली उनमुखे, रेखा चव्हाण रेणुका चरावंडे, सपना लाळे, तस्लिम पठाण, पार्वती कावळे,सारिका मिंड, विद्या गजभिये, शीतल काळे, सविता मोहिते, रूपाली तोटे, दिपाली दरगड जयश्री नरवाडे, जयश्री कास्तोडे, नूतन नलावडे आदी महिला पालकांचा समावेश यावेळी होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक भालचंद्र महाजन विश्वनाथ वाघमारे मेधा पाथरकर, गाडेकर,पांडे सोपान सांगळे, विजयकुमार दंदाले, धनंजय आष्टीकर, उज्वला काकलीस,कोमल वायाळ,स्वाती मोरे, कोमल वायाळ सुजाता तापडियाआदी शिक्षकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा आकात यांनी केले तर आभार प्रदर्शन उज्वला शिंदे यांनी केले.

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान