मराठवाडा वॉटर ग्रीड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुनरुज्जीवित करण्याचा फेरविचार करा - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे राज्यपालांना भगतसिंह कोश्यारी पत्र,मराठवाड्यातील आमदारांच्या शिष्टमंडळासह घेणार राज्यपालांची भेट,मराठवाडा वॉटर ग्रीड पुनरुज्जीवन प्रश्नी राज्यपालांनी व्यक्तिशः लक्ष घालावे- लोणीकर यांची राज्यपालांना विनंती

प्रतिनिधी- हनुमंत दवंडे 
मराठवाड्याला स्वच्छ पाणी मिळू नये, येथील आत्महत्या थांबू नये, मराठवाड्याचा विकास होऊ नये, दुष्काळवाडा म्हणून मराठवाड्याची ओळख पुसली जाऊ नये असेच विद्यमान महाविकास आघाडी सरकारला वाटते काय? शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आपण सरकारला योग्य त्या सूचना कराव्यात. अशी विनंती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्यपाल भगतसिंह जी कोश्यारी यांना पत्राद्वारे केली आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा हा सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेला विभाग आहे कोरडवाहू जमीन परवडत नाही म्हणून पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत अजूनही आत्महत्त्यांचे हे सत्र थांबलेले नाही दुष्काळाचा हा मराठवाड्याला लागलेला कलंक पुसून काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात इजराइल च्या राष्ट्रीय जल व्यवस्थापन समितीने मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प अहवाल तयार केला होता परंतु दुर्दैवाने सरकार बदलले आणि मराठवाडा वॉटर ग्रीड हा शेतकर्‍यांच्या हितासाठी उभारण्यात येणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प धूळखात पडला आहे. असेही लोणीकर यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे

देशाचे महामहीम पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी संभाजीनगर, नांदेड, परतूर आणि परळी या ठिकाणी लाखो लोकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेत मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे कौतुक केले होते व यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासनही दिले होते परंतु विद्यमान महाविकास आघाडी सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड साठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद केलेली नाही मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही ग्रीड अत्यंत महत्त्वपूर्ण असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे भाग्य बदलणारा प्रकल्प आहे. तो पूर्ण व्हावा यासाठी राज्यपाल यांनी व्यक्तिशः लक्ष द्यावे अशी विनंती मराठवाड्याच्या वतीने लोणीकर यांनी केली आहे

'दुष्काळवाडा' म्हणून मराठवाड्याला असणारा कलंक पुसणारी उद्योगाला शेतीला आणि सर्वसामान्य लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे या उदात्त हेतूने ही ग्रीड सुरू करण्यात आली होती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव या ५ जिल्ह्यांचा प्रकल्प अहवाल तयार होऊन निविदा देखील प्रसिद्ध झाल्या होत्या परभणी, हिंगोली व नांदेड या तीन जिल्ह्यांचा प्रकल्प अहवाल तयार होता महाराष्ट्राचे तत्कालीन पाणीपुरवठा खाते व इस्रायलचे पाणी पुरवठा खाते यांच्या संयुक्त माध्यमातून मेकोरेट या जगविख्यात कंपनीने अहवाल बनवण्यात आला होता. असेही लोणीकर यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

मराठवाड्यातील आमदारांच्या शिष्टमंडळासह आपण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जी यांची भेट घेणार असून मराठवाडा वॉटर ग्रीड चे पुनरुज्जीवन व्हावे व मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा मराठवाड्यात शेतीला उद्योगाला व पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे हा आम्हा सर्व लोकप्रतिनिधींचा प्रयत्न असून त्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड पुनरुज्जीवित होणे अत्यंत आवश्यक आहे"*
*- बबनराव लोणीकर*
(माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा आमदार परतुर विधानसभा)
==========================

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती