भीम जयंती कशी साजरी करणार? डीजेच्या तालावर की विचारांच्या?--एडवोकेट महेंद्रकुमार वेडेकर


परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे
विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याची संधी दोन वर्षे मिळाली नाही याची खंत अनेकांना आहे. त्यामुळेच या वर्षी दोन वर्षाचा खर्चडा डीजे वाजून बेधुंद होऊन नाच-गाणे करुन करणार अशा पोस्ट सोशल मीडियावर हजारोच्या संख्येने फिरत आहे 
       त्यामुळे दोन वर्षात शिक्षण ,आरोग्य ,आणि रोजगार वर काय परिणाम झाला याची थोडी खंत आम्हाला नाही. त्याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1941 आणि ब्रिटिश गव्हर्नर मध्ये कामगार मंत्री असताना काय काय कामगार कायदे बनवून देशातील असंघटित कष्टकरी कामगार मजुरांना दिले यांची थोडी सुद्धा जाणीव आजच्या असंघटित कष्टकरी कामगारांना नाही .तो झोपडपट्टीत राहणारा ग्रामीण गावातील खेड्यात पाड्यात राहणारा असंघटित कामगार भीम जयंती एक दिवस नाही तर पाच दहा दिवस साजरी करण्याकरता परवानगी मिळावी म्हणून वरिष्ठ अधिकारी यांच्याशी वाद घालत आहेत .जागरूक अधिकारी विचारतात दहा दिवस कोणते उपक्रम राबवणार याची लेखी माहिती देण्यात यावी.
आणि वर्षभरात कोणकोणते सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक, कला ,क्रीडा, प्रोत्साहन देणारे प्रेरणादायी उपक्रम राबविले त्याची माहिती द्यावी .शांत डोक्याने विचारले जाते याची ठोस उत्तर कार्यकर्त्याकडे नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कोणतेही विचार आम्ही शांत डोक्याने मेंदूत कधीच घेतले नाहीत त्यामुळेच त्याचा जमाखर्च ताळेबंद कागदावर लेखी मांडणे अशक्य आहे .आम्ही संघटित कामगार असण्यापेक्षा असंघटित कामगार मजूर जास्त आहोत याची जाणीव बाबासाहेबांना होती .म्हणूनच त्यांनी कामगारांच्या समस्या व उपाय यावर अभ्यासपूर्ण मांडणी केली होती हे त्यांनी 1941 लिहून ठेवले होते त्यांची कामगार चळवळी बाबत विशेष भाषणे होती देशातील पहिली सफाई कामगारांची मुन्सिपल कामगार संघ ही विनियंन त्यांनी मुंबईत बांधली1942साली तिचे पाच हजार सभासद झाले होते.
आजच्या घडीला मुंबईसह राज्यात देशातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद ,नगरपंचायत, आणि ग्रामपंचायत मध्ये 365 दिवस चालणारे साफसफाई काम कंत्राटी पद्धतीने चालविले जाते आणि 90 टक्के कामगार हे मागासवर्गीय म्हणजेच बाबासाहेबांचा जयजयकार करणारे आहेत. म्हणूनच लिहितो भीम जयंती कशी साजरी करा डीजेच्या तालावर ती विचारांच्या..
मनुवादी विचारांचा कार्यकर्ता मात्र शांत डोक्याने एकेक कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने रचनात्मक काम करून संविधानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हळूहळू तुमच्यासाठी रात्र नव्हे तर दिवसही वैऱ्याचा असेल आत्ताच प्रयत्नशील राहा .नाहीतर अवलाद होईल तुझी मुकी बहिरी वरून सांगते जगाला घटना लिहिली बापाने पण टिकवली नाही त्यांच्या लेकाने म्हणण्याची पाळी येईल भीम जयंती कशी साजरी करायची डोके असणाऱ्यांनी शांतपणे विचार करून नियोजन करावे शांत डोक्याने नियोजन आहे त्यांचे 2025 ला कटिबद्ध हळूहळू हिंदुराष्ट्र करतील सिद्ध तुम्ही भीम जयंती कशी साजरी करणार डीजेच्या तालावर नाचून गाऊन घोषणाबाजी करणार हम भीम की अवलाद अंगार है, बाकी सब भंगार है तुम्ही फक्त भीम जयंती निमित्त करत राहणार राज्यघटनेचा जय जयकार ते मात्र घटनेचा एक एक कलमावर घालत राहतील घाला. त्यानुसार त्यांनी खाजगीकरण करून आरक्षण संपवलं शिक्षण आरोग्य महाग करून ठेवलं.
आहे शिक्षण, आरोग्य ,महाग करून ठेवले तुमच्यासाठी काय आहे तर कायमस्वरूपी काम करणारा कंत्राटी कामगार म्हणून तुमची ओळख निर्माण केली जात आहे. म्हणूनच भीम जयंती कशी साजरी करणार डीजेच्या तालावर की विचारांच्या जोरावर ठरवावे लागेल कशी करावी भीम जयंती साजरी. 131 वी भीमजयंती निमित्ताने स्वतःचे घर परिसर स्वच्छ ठेवावा शक्य असेल तर घरांना रंग द्यावा ,कपडे, नवीन घेता येत नसतील तर आहेत ते स्वच्छ धुऊन घ्यावेत घरावर रोषणाई करावी घरासमोर दिव्यांचा झगमगाट करावे यासाठी गोड पदार्थ करायचे मद्यपान करू नये, घरातील सर्वांना नवीन शुभवस्तू घ्यावेत घरासमोर सडा रांगोळी काढावी घरोघर दारासमोर बाबासाहेब यांची सुंदर प्रतिमा ठेवून पुष्पहाराने पूजन करावे प्रत्येक घरी निळ्या रंगाचे ध्वजारोहण करावे या वेळी शेजारी मित्र परिवारास निमंत्रित करावे .
ध्वजारोहण झाल्याबरोबर मुलांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त करावा मित्र नातेवाईकांना फराळ द्यावा .
घरात बाबासाहेबांच्या गीतांची हलकी धून ठेवावी शक्य झाल्यास बाबासाहेब यांचीपुस्तके फोटो गीतांची सीडी इत्यादी एकमेकांना भेट द्यावीत. जयंती उत्सव दिन ठरल्यानंतर सार्वजनिक व्याख्यान समाज प्रबोधनपर कार्यक्रम मिरवणुकी पूर्वी एक दिवस किंवा मिरवणूक पार पडल्यानंतर ठेवावा मिरवणुकीदरम्यान फक्त बाबासाहेब व बौद्ध गीत वाजवीत आपली गीते लाखापेक्षा जास्त आहेत मिरवणुकीदरम्यान वाद विवाद टाळावेत. शांतता राखावी लोकांनी मिरवणूक गेल्यानंतर नाव काढले पाहिजे मद्यपान करू नये, तर बाबासाहेबांच्या अभिमानाची अशी नशा व्हावी की तिच्यापुढे दारूची नशा फिकी पडावी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे. जयंती ची वर्गणी फक्त आंबेडकरी जनतेकडूनच घ्यावी स्वतःहून जर कोणी वर्गणी देत असेल तर ती स्वीकारावी आपल्या कमाईतील विसावा.
हिस्सा सामाजिक ,शैक्षणिक, उपक्रमात धाम करावा त्यातूनच सामाजातील हुशार विद्यार्थी व सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे सत्कार करावेत कल्पकतेने जे काही चांगले करता येण्यासारखे आहे ते जरूर करावे ही भीम जयंती आगळीवेगळी जगावेगळी साजरी करावी जगात एकही राष्ट्र नाही की राज्य नाही जिथे भीम जयंती साजरी होत नाही त्.यांच्यासाठी प्रेरणादायी रचनात्मक कार्य करणारी असते आपल्यासाठी काय असावी ही भीम जयंती भीम जयंती कशी साजरी करा ?डीजेच्या तालावर की विचारांच्या जोरावर, प्रेरणादायी ठरावी तर महामानव डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा जयजयकार होईल अन्यथा धांगडधिंगा घालून विचाराची जाहीरपणे हत्या होत आहे ,असे कोणी बोलू नये याची दक्षता घ्यावी .हीच अपेक्षा 131 व्या भीम जयंती निमित्ताने हार्दिक शुभेच्छा..

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती