राज ठाकरे यांच्या औरंगाबाद मध्ये होणाऱ्या सभेला परवानगी न देण्याची मागणी., परवानगी दिल्यास आत्मदहन करणार मंठा येथे नागरिकांनी दिले निवेदन.मंठा - सुभाष वायाळ
दि.२७ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची एक मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिस प्रशासन व राज्य सरकारने परवानगी न देण्याची मागणी मंठा तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व गृहमंत्री यांना निवेदन पाठवून मागणी केली आहे. निवेदनात पुढे म्हटले की सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात सत्तेच्या स्वार्थासाठी मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे हे.जातीवादी चे राजकारण करीत आहे.व शांत महाराष्ट्र राज्याला पेटविण्याचे काम करीत आहे. मुंबई येथिल सभेत त्यांनी मुस्लिम समाजाच्या मस्जिद वरील भोंग्याबबात व अजान बाबत नवा वाद निर्माण करुन सभेत प्रक्षोभक भाषण करुन हिंदु मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.व समस्त मुस्लिम समाजाचे भावना दुखावल्या आहे. राज ठाकरे भर सभेत मुस्लीम समाजाच्या विरोधात चेतावनी खोर भाषण खुले आम करीत आहे. व पवित्र अजानच्या विरोधात मस्जिदीसमोर भोंगे लावुन दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करण्याची धमकी देत
आहे.त्यामुळे हिंदु मुस्लीम समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करुन महाराष्ट्रात हिंदु
मुस्लीम समाजामध्ये जातीय दंगल लावण्याचे काम करीत आहे.तरीही महाराष्ट सरकार कडुन व महाराष्ट्र पोलीसा कडुन राज ठाकरे वर कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही.असे का? तर 1 में रोजी औरंगाबाद मध्ये होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला पोलिस प्रशासन व राज्य सरकारने परवानगी न द्यावी नसता मराठवाडा व महाराष्ट्र राज्यात कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल,
       परवानगि दिल्यास  पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथेआत्मदहन करण्याचा इशारा शेवटी निवेदनात देण्यात आला आहे
 निवेदनावर सय्यद रफिक, मोसीन कुरेशी,प्रदीप मोरे,एजाज भाई, लखन कांबळे, लायक कुरेशी,बंडू बोराडे, मुस्ताक कुरेशी,ताहेर बागवान,भगवान शिंदे,यांचे स्वाक्षऱ्या होते.

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान