जिल्ह्यातील अपंग निराधार वयोवृद्ध यांची पेन्शन बँक खात्यात जमा करावी___ अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना

परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
      परतुर तालुकयातील व जिल्ह्यातील अपंग निराधार वयोवृद्ध यांची गेल्या चार महिन्यापासून शासनामार्फत दिली जाणारी मासिक पेन्शन झालेली नाही तरी ,अपंग वयोवृद्ध यांचे जीवन हे पेन्शनवर अवलंबून असून व शासनामार्फत दिली जाणारी पेन्शन सुद्धा चार महिन्यापासून मिळालेली नाही तसेच दुसरीकडे महागाई वाढत असून जीवन जगणे कठीण होत आहे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे आज अपंग व वृद्ध यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे
           तरी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी वैयक्तिक लक्ष घालून जिल्ह्यातील तहसीलदार साहेबांना अपंग व वयोवृद्ध यांची मासिक पेन्शन बँक खात्याम ध्ये जमा करण्याचे आदेश द्यावेत असे प्रसिद्धी पत्रकामध्ये अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना यांनी म्हटले आहे

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान