महसुल पथकाच्या सरकारी कामात अडथळा करणाऱ्या आरोपी सह १७ लाखाचे टिप्पर जप्तमंठा-प्रतिनिधी सुभाष वायळ
. तालुक्यातील सासखेडा येथे दि. ११/०४/२२ रोजी दु ०२:०० वाजता येथील जिल्हा परीषद शाळे समोर अवैध रित्या साठवुन ठेवलेल्या वाळु साठ्यातुन वाळु भरतांना टिप्पर क्रमांक MH-21BG-4027 चे चालक व मालक व तेथेच कार मध्ये बसलेले इतर चार जण हे महसुल पथकातील तलाठी महेंद्र प्रभाकर साळवे तलाठी सज्जा दुधा ता मंठा जि जालना यांना अवैध रीत्या वाळु भरतांना आडळुन आले महसुल पथकातील तलाठी कारवाई करतील म्हणुन टिप्पर चालक व तेथेच कार मध्ये बसलेले इतर चार जणांनी तलाठी साळवे यांना धमदाटी करून टिप्पर मधील वाळु खाली करून तेथुन पळुन गेले.म्हणुन तहसीलदार मंठा यांच्या आदेशाने तलाठी साळवे यांनी सदरील आरोपींच्या विरूद्ध मंठा पोलीस ठाणे येथे सरकारी कामात अडथळा व अवैध वाळु चोरीचा गुन्हा दाखल केला आहे यात आरोपी (१)पवन सुभाष राठोड वय २४ वर्ष रा नायगांव ता मंठा टिप्पर चालक यास ताब्यात घेवुन टिप्पर चालकाच्या म्हणण्याप्रमाणे टिप्पर मालक विजय उत्तम चव्हाण वय ४२ वर्ष रा हिवरखेडा सध्याचा पत्ता तळणी फाटा रोहाऊस यांच्या राहत्या घरासमोरून टिप्पर क्रमांक MH-21-BG-4027 हे टिप्पर ज्याची अंदाजीत किंमत १७ लाख रूपय तपासासाठी जप्त करण्यात आले आहे.
सदरील कारवाई मा. प्रभारी पोलीस अधिक्षक साहेब जालना मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजु मोरे परतुर मां.पोलीस निरिक्षक संजयजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो उपनिरीक्षक बालभिम राऊत, पो अमलदार शाम गायके, आसाराम मदने,दिपक आढे,यांनी कारवाई करून गुन्हा उघडकिस आणुन एका आरोपीस अटक करण्यात आले.पुढिल तपास पो उपनिरीक्षक बालभिम राऊत हे करीत आहेत.

Popular posts from this blog

हातडी शिवारात बिबट्याची भटकंती;शेतकर्‍यात भितीचे वातावरण,शोधमोहिम सुरू शेतकर्‍यांना काळजी घेण्याचे आवाहन

परतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि