परतुर येथे आम आदमी पार्टी ची आढावा बैठक संपन्न परतुर तालुकाध्यक्ष पदी प्रभाकर प्रधान यांची निवड
परतूर प्रतीनीधी हनुमंत दंवडे
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्र राज्य समिती यांच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये मराठवाड़ा विभाग समितीचे संगठन मंत्री सुग्रीव मुंढे, मराठवाड़ा सचिव अनिल ढवळे, मराठवाड़ा सोशल मीडिया प्रमुख योगेश गुल्लापली यांच्या प्रमुख मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे यांच्या अध्यक्षेखाली परतुर मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले असता येणाऱ्या काळात होत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका विषय मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच परतुर तालुकाध्यक्ष पदी प्रभाकर प्रधान यांची तर शहर सचिव पदी नामदेव पहाडे यांची निवड करण्यात आली. यावेळी मराठवाडा विभाग संगठन मंत्री सुग्रीव मुंढे, मराठवाडा सचिव अनिल ढवळे, मराठवाडा सोशल मीडिया प्रमुख ॲड. योगेश गुल्लापेल्ली, जालना जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे, जिल्हा संगठन मंत्री प्रा. सुभाष देठे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पाडण्यात आली आहे. यावेळी सारनाथ सोनपसारे, किशोर गरड, विकास यादव, तुषार पहाडे, सचिन साळवे, भगवानदादा साळवे, रोहीत फुलमाळी, नितीन भदंर्गे, कैलास भालेकर, देविदास धबाले सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment