परतूर पंचायत समिती मध्ये कृतज्ञता दिन साजरा ..


 परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
 डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व सामाजिक न्याय भवन समाज कल्याण विभाग जालना पंचायत समिती परतुर आधार बहुउउदेशिय सेवाभावी संस्था वाटुर ता परतुर यांच्या वतीने आज 6 मे 2022 रोजी राजश्री श्री शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त 100 सेकंद स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली तसेच राजश्री शाहू महाराज यांनी केलेले समाजकार्य शैक्षणिक कार्य व इतर सर्व कार्याबद्दल प्रबोधनात्मक कार्यक्रमही डॉ रेखा बोर्डे यांनी सांगितले 
लोकनेता राजश्री शाहू महाराज यांचे हे स्मृति शताब्दी
( १९२२ते२०२२) वर्ष असल्यामुळे सामाजिक न्याय विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी च्या वतीने कृतज्ञता पर्व म्हणून साजरी करण्यात येत आहे या अंतर्गत परतूर तालुक्यामध्ये सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम ऊस तोड कामगार सर्वे आर टी आय सर्वे ॲट्रॉसिटी ॲक्ट संदर्भात मार्गदर्शन दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना संदर्भात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून माहिती गोळा करणे तसेच शैक्षणिकदृष्ट्या उपक्रम व अशा विविध योजनेचा प्रचार-प्रसार होत आहे या प्रचार-प्रसार आतून अनेक विद्यार्थ्यांना अनेक जनसमुदाय यांना लाभही मिळत आहे तसेच खऱ्या अर्थाने सामाजिक चळवळीचे भान ठेवून तळागळातील लोकांना फुले शाहू आंबेडकर यांचे विचार पोहोचण्यासाठी नेहमीच व्याख्यानाच्या तसेच तारीख विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मॅडम आम्हाला मार्गदर्शन करत असतात तसेच आजच्या या कार्यक्रम मध्ये राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार देखील 2021 चा वितरित करण्यात आला यामध्ये अनुष्का ज्ञानेश्वर भिंगे आनंद माध्यमिक विद्यालय रितेश कैलास भालके समर्थ महाविद्यालय पाटोदा या दोन विद्यार्थ्यांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आलाया सर्व कामासाठी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे बार्टीचे महासंचालक माननीय धम्मज्योती गजभिये साहेब तसेच समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अमित घवले सर यांचेही मार्गदर्शन लाभले गटविकास अधिकारी नंदकिशोर शेरखाने मारकवाड विस्तार अधिकारी श्री शहाने परदेशी. नाखले.समता दुत डॉ रेखा बोर्ड उमेद तालुका व्यवस्थापक संदीप दाभाडे अर्चना गरड अर्जुन राठोड व्यवस्थापक आपले सरकार एकनाथ राऊत अध्यक्ष अधार बहुउउदेशि य सेवाभावी संस्था वाटुर ता परतुर दत्ता राउत कनिष्ठ सहाय्यक पी एन चव्हाण.
  उपस्थित होते

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती