सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

प्रहारच्या मागणीला यश-अशोक तनपुरे

परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
परतुर येथे ग्रामीण रुग्णालय येथे प्रहार संघटनेच्या वतीने विविध निवेदन आंदोलन केले परतूर येथे ग्रामीण रुग्णालयात अपंगासाठी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात यावी याकरिता दोन वर्षापासून संघर्ष चालू होता तरी या मागणीला प्रतिसाद देत ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधीक्षक डॉ. ज्ञानदेव नवल  यांनी अपंग तपासणी व प्रमाणपत्र या मागणीचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठविला तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी परतूर येथे दुसरा शनिवार व चौथा शनिवार अपंग प्रमाणपत्र देण्यासाठी अपंग तपासणी व प्रमाणपत्र मान्यता दिली यामध्ये अस्थिव्यंग व अल्पदृष्टी या तपासणीला मान्यता दिली यामुळे तालुक्यातील अपंग बांधवांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही यामुळे अपंग बांधवांचे जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याकरता मोठे आर्थिक व वेळही जाणार नाही याबद्दल अशोक तनपुरे यांनी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधीक्षक डॉ ज्ञानदेव नवल  तसेच जिल्हा रुग्णालयाचे तज्ञ डॉ भगत  यांचे आभार मानले

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत