गुणवंतांनी प्रगतीचे शिखर गाठावे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर ,यश मिळवण्यासाठी कठीण परिश्रम करणे गरजे आपल्यातील गुणांचा उपयोग समाजासाठी व्हावा,*परतूर येथे युवा मोर्चाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार संपन्न*


परतूर प्रतिनिधी हनुमंत दंवडे
विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवण्यासाठी आता परिश्रम करण्याची गरज असून आज आपला गुणवंत म्हणून सत्कार करताना आनंद होत असून यापुढेही जाऊन आपण जिल्हा राज्य स्तरावर घवघवीत यश संपादन करावे असे आवाहन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली
ते परतुर येथे गजानन मंगल कार्यालयात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने घेण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की प्रत्येकाने स्वतःमधील क्षमता ओळखून तिला विकसित करणे गरजेचे असून खऱ्या अर्थाने युवाशक्ती ही या देशाचा आधार असून देशाला प्रगतीच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी युवकांनी नित्य प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करावा असेही यावेळी बोलताना ते म्हणाले
  प्रगतीच्या माध्यमातून सुसंगती चैतन्य संस्कार या सर्व गोष्टी जन्म घेत असतात म्हणून आपण सर्वांनी आपल्यात असलेले पैलू ओळखून त्या दिशेने आगे कूच करावी असे आमदार लोणीकर म्हणाले
प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये मी माझे बेस्ट देईल याचा विचार केल्यास निश्चितच समाज उन्नती होईल असेही यावेळी लोणीकर यांनी नमूद केले 
मला माझ्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करायची होती म्हणून मी गेल्या 35 ते 40 वर्षापासून सदैव सर्व सामान्यांचे दुःख समजून त्यावर उपायोजना करण्यात घालवली हे करीत असताना अनेक कठीण प्रसंग आले मात्र तोड देत आज मी या उंचीवर येऊन पोहोचलो म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनाचे लक्ष निश्चित करून काम केल्यास शंभर टक्के यश मिळते असेही यावेळी लोणीकर म्हणाले
आपण स्वतः पुढाकार घेत मंत्रीपदाच्या काळामध्ये मतदार संघ व जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला होता परतुर विधानसभा मतदारसंघांमध्ये असलेल्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपले सर्व सोपनाला लावून नियमितपणे आपण काम करत आलेलो असून यापुढेही अशाच प्रकारचे काम आपल्या हातून व्हावे यासाठी मी सदैव प्रयत्नशील असतो असेही यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमदार लोणीकर यांनी सांगितले
 ज्ञान साधने बरोबरच माता पित्याची सेवा करणे आपली आद्य कर्तव्य असून आपल्याला फुलासारखी जपणाऱ्या पालकांना आपणही त्याच पद्धतीने जपणे गरजेचे असून एक पालक म्हणून आपले आई-वडील आपल्यासाठी काय काय करतात याची जाणीव ठेवून आपण ज्ञानसाधना केल्यास निश्चितपणाने आपली प्रगती कोणीही रोखू शकणार नाही असे ही यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
यावेळी बोलताना युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी कठीण परिश्रमातूनच खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्वाला पैलू पडतात असे सांगतानाच गुणीजनांचे आपण कौतुक करत असून येणाऱ्या भविष्य काळामध्ये डॉक्टर इंजिनियर वकील यासह विविध महत्त्वाच्या पदावर आपण काम करून देशाला सेवा देण्याचे काम करावे असे राहुल लोणीकर यांनी यावेळी नमूद केली
जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी सदैव ध्यास घेऊन झपाटून काम केल्यास निश्चित मनाने यश मिळते असे यावेळी बोलताना राहुल लोणीकर यांनी सांगितले कार्यक्रमाला युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर भगवानराव मोरे पंचायत समिती सभापती रंगनाथ येवले उपसभापती रामप्रसाद थोरात जि प सदस्य सुदाम प्रधान पंचायत समिती सदस्य दिगंबर मुजमुले प्रदीप ढवळे शिवाजी पाईकराव दया काटे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संपत टकले युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघन कणसे सुधाकर बापू सातोनकर संदीप बाहेकर प्रकाश चव्हाण कृष्ण आरगडे सिद्धेश्वर सोळंके तुकाराम सोळंके रवी सोळंके संभाजी वारे राजू ढवळे, श्यामसुंदर चितोडा सोनू अग्रवाल ज्ञानेश्वर जईद जितू अण्णा अंभोरे बाबाराव थोरात बबलू सातपुते परतुर पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक कोठाळे गटशिक्षणाधिकारी साबळे गट समन्वयक कल्याण बागल ढवळे सर राम सोळंके यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी पालक शिक्षक यांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती