ओला दुष्काळ जाहीर करुनहेक्टरी पन्नास हजारांची मदत द्यावी- सचिन खरात


      परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
जुलै महिन्यात परतुर तालुक्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या तालुकाध्यक्ष सचिन खरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे
शिवसंग्राम संघटनेच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांनादिलेल्या निवेदनात नमूद आहे की, परतुर तालुक्यात गत दहा ते पंधरा दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुराचे शेतीत पाणी शिरून शेतजमीन पाण्याखाली आली आहे. पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके केली आहे.
बुडाल्यात जमा आहे. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर आणि भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शेतीसाठी लागलेला खर्चही निघणार की नाही, या चिंतेने शेतकरी हवालदिल झाले आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन खरात, दत्ता लवंगरे मनोज वटाने, दत्ता राजकवर, रामेश्वर जगताप, आदी शेतकरी उपस्थित होते.

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान