मोहन अग्रवाल यांच्या प्रयत्नामुळे परतूर शहरासाठी आणखीन एक कोटी रुपये मंजूर

 परतूर/ प्रतिनिधी हनुमंत दंवडे
शहरातील विविध विकास कामासाठी शिवसेना जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांनी तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व तात्कालीन,नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाठपुरावा करून ५ कोटी रुपये निधी या पूर्वीच परतूर शहराला मंजूर करून शहरात जवळपास ३५ ठिकाणी रस्ते तयार करण्यात आले. 
      त्यातच भर म्हणून शासन दरबारी परत पाठपुरावा करून मोहन अग्रवाल यांनी नगर विकास विभागाकडून आणखिन १ कोटी १० लाख रुपये निधी मंजूर करून आणला आहे.त्यामध्ये राजे संभाजी नगर, सरस्वती कॉलनी ,सन्मित्र कॉलनी, होलाणी दाल मिल इत्यादी ठिकाणी सी सी रोड व आवश्यक त्या ठिकाणी नाली व ढाप्याचे कामे करण्यात येणार आहेत. भरपूर निधी खेचून आनल्या बद्दल मोहन अग्रवाल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. आता पर्यंत मोहन अग्रवाल यांनी परतुर शहरास विकास कामासाठी वेगवेगळ्या निधीतून जवळपास ६ कोटीच्या वर निधी खेचून आणला *एक सर्वसाधारण नगरसेवक असताना एवढा प्रचंड निधी आणल्याने भविष्यात मोहन अग्रवाल यांच्या कडून परतुरकरांच्या अशा वाढल्या आहेत* परतूर शहरातील सुजान नागरीक येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कामाची चर्चा करीत आहेत.

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान