मंठा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा - अखिल भारतीय मराठा महासंघ


मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ
मंठा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व मंठा तालुक्यातील ज्या मंडळात अतिवृष्टी झालेल्या मंडाळा मध्ये तात्काळ पंचनामे करून सरसकट अनुदान देण्यात यावे. अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ मंठा तालुक्याच्या वतीने मा. मुख्यमंत्र्यांना निवेदन तहसीलदार मंठा यांच्या मार्फत देण्यात आले.
     मंठा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्जनवृष्टी झाली असल्यामुळे तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कोपा मुळे हिरावून घेतला आहे.अनेक शेतकऱ्यांच्या राहत्या घराचे नुकसान झाले आहे. सुखाचा संसार उद्ध्वस्त झाले आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे उभे पीक मुळा सही सडुन गेले आहे. काही पीके वाहुन गेले आहे यांमुळे शेतकरी आथिर्क मोठ्या संकटात सापडले आहेत त्यामुळे पंचनामे करून सरसकट मदत देण्यात यावी. नसता अखिल भारतीय मराठा महासंघ मंठा तालुक्याच्या वतीने लोकशाही मार्गाचा अवलंब करून आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने विचार करून नोंद घ्यावी ही विनंती यावेळी करण्यात आली. मंठा तालुक्याच्ये नायब तहसीलदार श्री दवने साहेब यांनी असे आश्वासन दिले की तात्काळ पंचनामे करण्यात येतील. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ मंठा तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख व तालुका कोषाध्यक्ष कैलास सरकटे आणि दिलीप चव्हाण, योगेश देशमुख, सुदंर काळे, योगेश दांडगे, कैलास भाग्यवान, महादेव खवने,अनंत चव्हाण, महादेव येऊल, राम किशन चव्हाण, अनिल घोडके, संतोष पवार, अभिषेक मुदळकर, प्रमेशवर मानकर, निलेश राठोड, राहुल सदावर्ते, आकाश राठोड, वैभव सदावर्ते आदी अखिल भारतीय मराठा महा संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog

हातडी शिवारात बिबट्याची भटकंती;शेतकर्‍यात भितीचे वातावरण,शोधमोहिम सुरू शेतकर्‍यांना काळजी घेण्याचे आवाहन

परतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि