मंठा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कलेच्या माध्यमातून साजरा



 मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
        दि.१५ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरबडा व बरबडा वसाहत केंद्र केंधळी ता. मंठा जि. जालना यांच्या संयुक्त विद्यमाने "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" निमित्त कलेच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास एकदिवसीय शिबिराचे आयोजन केल्याप्रसंगी या शिबिरास मार्गदर्शन प्रमुख वक्ते सतीश पाटील खरात लिंबेवडगावकर ललित कला केंद्र सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव प्रसंगी सतीश खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले की, कला ही जीवन जगण्याची, आनंददायी, शैक्षणिक वैज्ञानिक ज्ञान, सामाजिक ज्ञान, सर्व बाबींनी बहु आयामी असे कलाशिक्षणातून विद्यार्थ्यांनी घडावे.
        शाळेतील गुरुजींनी शिकवलेल्या शिक्षणातून विद्यार्थ्यांनी त्या शिक्षणाची शिदोरी घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करावी. राष्ट्रभावना, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम सदैव जागृत ठेवून देशाची सेवा करावी. सतीश खरात यांनी आपल्या कलेतून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून विविध अंगी नाट्यछटाद्वारे आरोग्य क्षेत्र, शिक्षण क्षेत्र कलाक्षेत्र वेगवेगळ्या क्षेत्राविषयी सविस्तर माहितीचा उलगडा करून विद्यार्थ्यांनी यश संपादन केले पाहिजे. स्वातंत्र्य भारताचा हा अमृत महोत्सव आपण आनंदाने उत्स्फूर्तपणे साजरा करत आहोत. असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
       या कार्यक्रमात प्रसंगी गावातील बाळासाहेब हजारे सरपंच, द्वारकादास चिंचाने उपसरपंच विजय भुतेकर ग्रामसेवक, शिवाजी हजारे शा. व्य. स. अध्यक्ष,व  राजेश हजारे शा. व्य. स. अध्यक्ष, चिंतामण गाडेकर,नबाजी वटाणे, रावसाहेब वटाणे,बबन वटाणे, प्रकाश हजारे,गोपाळ कडूकर,संतोष हजारे,माऊली हजारे,शिवाजी हजारे, गजानन वायाळ मु अ.नामदेव चव्हाळ मु अ. स्वाती बनसोडे, मोहन तुरुकमाने आदींची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण