मंठ्यात जि.प. नुतन उर्दू शाळेत शिक्षकाची रिक्त पदे त्वरीत भरावी गटशिक्षणाधिकारी शिंदे यांना पालकांची मागणी
      मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
         दि.१६ शहरातील जि.प. उर्दू प्रा.शाळा नूतन शाळेत इ.१ ते ८ पर्यंत वर्ग असून एकूण विद्यार्थी ३५३ वर्ग १ ते ५ पर्यंत २२५ विदयार्थी व वर्ग ६ ते ८. १२८ विद्यार्थी असे एकूण विद्यार्थी ३५३ आहेत त्यासाठी आर.टी.ई २००९ नुसार शाळेत शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणीचा निवेदन शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी सतीश शिंदे मार्फत मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. जालना मा. शिक्षणधिकारी जि.प. जालना मा. शिक्षण संचालक पुणे मा. शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मा. केंद्र प्रमुख नूतन मंठा यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी केंद्रप्रमुख ए. आर. कुरेशी, गटसमन्वयक के. जी. राठोड, हाफेज शबाब बागवान जिल्हा परिषद कन्या शाळाचे उपअध्यक्ष अशपाक शेख यांची उपस्थिती होती.
       या निवेदनत म्हटले आहे की
   शासनाचे नियमानुसार ३० विद्यार्थीवर एक शिक्षक मान्य असून आमच्या शाळेसाठी हा नियम लागू नाही का ? शासनाचे नियम फक्त कागदावर पुरतेच आहेत का ? असा प्रशन निर्माण केला आहे. 
 
या निवेदनात शासनाला ईशारा देण्यात आला आहे की जि.प. उर्दू प्रा. शाळा नूतन या शाळेत शासनाचे नियमानुसार शिक्षक दिले नाही तर शालेय व्यवस्थापन समिती व पालक वर्गाकडून शाळेस कुलूप ठोकण्यात येईल तरी तात्काळ जिल्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून याची नोंद घ्यावी असे शेवटी या निवेदनात म्हटले आहे .

      यानिवेदनावर शाळा व्यवस्थापण समितीची अध्यक्षा नाजिया ईनुस कुरेशी, सलीम शेख, इमरान शिरगुल खान, जमिल खान, सौ अनीसा कुरैशी , हाफेज जब्बार शब्बीर शाह , मौलाना आहद , हाफेज साकीब, यांच्यासह पालक वर्गच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण